CoronaVirus News: Corona Virus seduces youth; The age group of the victims has changed! | CoronaVirus News : कोरोनाचा तरुणांना विळखा; बाधितांचा वयोगट बदलला!

CoronaVirus News : कोरोनाचा तरुणांना विळखा; बाधितांचा वयोगट बदलला!

- अतुल कुलकर्णी

मुंबई : ५० ते ६० वर्षे वयोगटाच्या लोकांना कोरोनाची लागण जास्त होते, असे सांगितले जात असले तरी ताज्या माहितीनुसार २१ ते ४० वयोगटातील तब्बल ३८.५५ टक्के तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे.
३१ ते ४० वयोगटातील २१.३१ टक्के तरुण कोरोनाबाधित झाले आहेत. महाराष्टÑात एकूण १०,९७,८५६ रुग्णांपैकी एमएमआर रिजनमध्येच ४,१७,८३५ रुग्ण आहेत. त्यामुळे जोपर्यंत एमएमआर रिजनमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात येत नाही तोपर्यंत मुंबईची लाइफलाइन लोकल ट्रेन सुरू होण्याची कोणतीही शक्यता नाही, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
१६ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी पाहिली तर महाराष्टÑात एकूण रुग्णसंख्येपैकी सगळ्यात जास्त म्हणजे २,२९,४८४ रुग्ण हे ३१ ते ४० वयोगटातील आहेत. त्यामागे, मला काही होत नाही, असे तरुणांना सतत वाटत राहणे, त्यातून विनाकारण बाहेर फिरणे, मास्क न लावणे, सतत हात न धुणे, बाहेरचे पदार्थ काळजी न घेता खाणे ही त्यासाठीची प्रमुख कारणे आहेत, असे वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी लोकमतला सांगितले.

- एका तपासणीसाठी आता १,२०० रुपये आकारले जात आहेत. एकूण तपासण्यांपैकी ११,५३,५८९ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत.
देशात मृत्युदराच्या बाबतीत महाराष्टÑ तिसºया नंबरवर आहे. पंजाब (२.९८%), गुजरात (२.७९%) तर महाराष्टÑ (२.७७%) असा मृत्युदर आहे, असेही त्यांनी सांगितले.

- आपल्याकडे तपासण्यादेखील आता वाढवण्यात आल्या असून आतापर्यंत 55,12,807 रुग्णांच्या तपासण्या केल्या
21,55,157 तपासण्या खासगी प्रयोगशाळेत करण्यात आल्या आहेत.

- लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणे असलेले, बरे होणारे रुग्ण २,६७,२९७ (२५%)
- एकूण गंभीर रुग्ण ९५१२ (१%)
- आयसीयूबाहेरील पण आॅक्सिजनवरील एकूण रुग्ण : १४,४४७ (१%)
- बरे झालेले रुग्ण : ७,५५,८५० (७०%)
- मृत्यू : २९,८९४ (३%)

राज्यातील टॉप पाच विभाग
कोकण (मुंबई विभाग) ४,१७,८३५
पश्चिम महाराष्टÑ (पुणे विभाग) ३,५४,११४
खान्देश (नाशिक विभाग) १,४१,५९७
विदर्भ (नागपूर/अमरावती विभाग) ९८,६७१
मराठवाडा (८ जिल्हे) ७३,७७०

कोणत्या वयोगटातील किती जणांना झाला कोरोना?
वयोगट रुग्णसंख्या टक्केवारी
० ते १० ४१,८०२ ३.८८
११ ते २० ७५,७७५ ७.०४
२१ ते ३० १,८५,५०८ १७.२३
३१ ते ४० २,२९,४८४ २१.३२
४१ ते ५० १,९१,९११ १७.८३
५१ ते ६० १,७०,९१० १५.८७
६१ ते ७० १,१२,३३५ १०.४३
७१ ते ८० ५२,३७७ ४.८६
८१ ते ९० १४,६८५ १.३६
९१ ते १०० १८१९ ०.१७
१०१ ते ११० ५ ०.००
एकूण १०,७६,६११ १००%

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Corona Virus seduces youth; The age group of the victims has changed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.