CoronaVirus News: 8151 new corona patients diagnosed and 213 die in a day in the state | CoronaVirus News : राज्यात दिवसभरात ८१५१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान, तर २१३ जणांना मृत्यू

CoronaVirus News : राज्यात दिवसभरात ८१५१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान, तर २१३ जणांना मृत्यू

ठळक मुद्देराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८६.०५ टक्के झाले आहे. आज २१३ कोरोनाग्रस्त रुग्णांनी प्राण गमावले आहेत.आतापर्यंत राज्यात ४२४५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाच्या आकडेवारीतही दररोज चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१५१ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १६०९५१६ वर पोहचली आहे. तर आज ७४२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत १३९२३०८ रुग्ण बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहेत. 

याचबरोबर, राज्यात एकूण १७४२६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच,  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८६.०५ टक्के झाले आहे. तर आज २१३ कोरोनाग्रस्त रुग्णांनी प्राण गमावले आहेत. आतापर्यंत राज्यात ४२४५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८२,५१,२३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,०९,५१६ (१९.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,३४,६८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,४८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: 8151 new corona patients diagnosed and 213 die in a day in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.