शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

CoronaVirus News: फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 6:02 PM

फडणवीस यांच्या आरोपांना महाविकास आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर

मुंबई: कोरोना संकटात केंद्राकडून राज्य सरकारला भरीव मदत मिळाली. मात्र तरीही राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या आरोपांना आज महाविकास आघाडी सरकारनं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस आणि मोदी सरकारचा समाचार घेतला.जबाबदार विरोधी पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपा संकट काळात सरकारच्या बाजूनं उभी राहील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून यंत्रणेचं आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी केली. मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या तिकिटाचा खर्च मुख्यमंत्री निधीतून केला जात आहे. मुख्यमंत्री निधीला फडणवीस यांच्या भाजपानं एका पैशाची मदत केलेली नाही. त्याऐवजी ते पीएम केअर्सला मदत करण्याचं आवाहन करत होते. त्यामुळे भाजपा महाराष्ट्राचा शत्रू आहे की मित्र असा प्रश्न निर्माण होतो. फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी केलेली ही कृती महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात राहील, असं पाटील म्हणाले.उत्तर भारतीय मजूर त्यांच्या गावी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व व्यवहार पूर्वपदावर वेळ लागेल, असं देवेंद्र फडणवीस काल बोलून गेले. फडणवीस यांचं विधान म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. राज्यातल्या तरुणांमध्ये आवश्यक कौशल्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्किल इंडिया योजना आणली होती. त्याचा पाच वर्षात काहीच उपयोग झाला नाही? स्थानिक तरुणांमध्ये स्किल नाही, असं फडणवीस यांना म्हणायचं आहे का? मोदींच्या स्किल इंडियावर त्यांना भरवसा नाही का?, असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले.देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीचा जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी उज्ज्वला योजनेतून देण्यात आलेल्या मदतीचा संदर्भ दिला. या योजनेतून ७३ लाख १६ हजार सिलिंडर दिले. त्यावर १ हजार ६२५ कोटी रुपये केंद्रानं खर्च केले, असं फडणवीस यांनी सांगितलं. या रकमेला सिलिंडरच्या संख्येनं भागलं, तर एका सिलिंडरची किंमत २ हजार २२६ रुपये होते. एका सिलिंडरची किंमत इतकी आहे का? मग केंद्राकडून दिलं जाणारं अनुदान कुठे गेलं?, असे सवाल पाटील यांनी विचारले. "काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Parabअनिल परबBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात