शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

CoronaVirus News: ...अन् शरद पवार पुन्हा मदतीला धावले; कोरोना संकट काळात मोलाची मदत

By कुणाल गवाणकर | Published: September 23, 2020 3:54 PM

CoronaVirus News: आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भेट घेऊन दिली माहिती

मुंबई: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी १ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून दिली आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपेंची भेट घेऊन शरद पवार यांनी तात्काळ १ हजार १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं सांगितलं. राष्ट्रवादीकडून ट्विटरवर याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.देशातील कोरोनाची लाट ओसरतेय?; बघा, आकडेवारी काय सांगतेयआज आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्यानं १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केल्याचं पवार यांनी टोपेंना सांगितलं. सर्वप्रथम गरजू आणि गरीब जनतेसाठी या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा वापर करा अशी सूचना यावेळी शरद पवार यांनी राजेश टोपे यांना केली. देशातील जवळपास एक चतुर्थांश कोरोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. काल दिवसभरात राज्यात १८ हजार ३९० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांचा आकडा १२ लाख ४२ हजार ७७० वर पोहोचला. काल दिवसभरात ३९२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ३३ हजार ४०७ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात २ लाख ७२ हजार ४१० रुग्णांवर उपचार सुरू असून ९ लाख ३६ हजार ५५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधानमुंबईत काल १ हजार ६२८ कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील बाधितांचा एकूण आकडा १ लाख ८७ हजार ९०४ वर पोहोचला आहे. काल दिवसभरात मुंबईत कोरोनामुळे ६० जण दगावले. शहरात आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या ८ हजार ५५५ झाली आहे. पुण्यात काल कोरोनाच्या १ हजार ४१४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील बाधितांचा आकडा १ लाख ४४ हजार २६५ वर गेला. काल दिवसभरात ४२ जण दगावले. त्यामुळे मृतांची संख्या ३ हजार ३०३ इतका झाला."चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात", वैज्ञानिकाचा आरोप

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSharad Pawarशरद पवारRajesh Topeराजेश टोपे