'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान

By manali.bagul | Published: September 23, 2020 11:41 AM2020-09-23T11:41:36+5:302020-09-23T11:54:48+5:30

कोरोना व्हायरसची सुरक्षित लस तयार होण्याची वाट जगभरातील सगळेच देश पाहत आहेत. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडनहॅम यांनी मंगळवारी एक धक्कादायक विधान केलं आहे. 'कोविड १९ ज्या ज्या लसींवर काम सुरू आहे. त्या लसी कोरोनावर मात करण्यासाठी यशस्वी ठरतील याची कोणतीही शाश्वती देता येणार नाही.'

जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीदरम्यान प्रमुख टेड्रोस अडनहॅम यांनी सांगितले की, ''जगभरात ज्या कोरोना लसींवर काम सुरू आहे. त्या लसी प्रत्यक्षात कितपत परिणामकारक ठरतील याची शाश्वती देता येणार नाही. आतापर्यंत अनेक लसींची पडताळणी जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली आहे. लवकरच सुरक्षित आणि प्रभावी लस मिळेल अशी आशा आम्हाला आहे.''

याशिवाय त्यांनी सांगितले, २०० लसींवर सध्या काम सुरू आहे. कोविड १९ च्या अनेक लसी प्री क्लीनिकल टेस्टिंगमध्ये आहे. लस निर्माण प्रक्रियेत काही लसी यशस्वी होतात. तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो.

WHO ने ग्लोबल वॅक्सीन एलायंस ग्रुप, Gavi आणि एपिडेमिक्स प्रीपेयर्डनेस इनोवेशंस यांच्याशी भागीदारी करून एक मोहिम सुरू केली आहे. जेणेकरून भविष्यात गरजू देशांना लस उपलब्ध करून दिली जाऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेनं या योजनेला कोवॅक्सिन असं नाव दिलं आहे.

आतापर्यंत जगभरातील १५० देशांसह कोवॅक्ससंबंधी भागिदारी करण्यात आली आहे. WHO नं इतर श्रीमंत देशांनाही कोवॅक्सच्या या योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

लस शोधण्यापासून उत्पादन, वितरण या उद्देशानं कोवॅक्सची योजना तयार करण्यात आली आहे. याअंतर्गंत गरीब, श्रीमंत देश एकत्र पैसे जमा करून लस खरेदी करणार आहेत. यात समावेश असलेल्या हाई रिस्क कॅटेगरीतील लोकांना सगळ्यात आधी लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

आतापर्यंत ६४ श्रीमंत देशांनी कोवॅक्स या योजनेत भाग घेतला आहे. अमेरिकेनं कोवॅक्समध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. चीन आणि रशियासुद्धा यात सहभागी नाही. जर्मनी आणि ब्रिटन हे देश यात सहभागी आहेत. येत्या काळात २४ देश या योजनेत सहभागी होतील असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांना आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एडवांस कमिटमेंटच्या माध्यमातून भारतानंही सहभाग घेतला आहे.

सुरक्षित आणि प्रभावी कोरोनाची लस मिळाल्यानंतर कॉवॅक्सच्या अंतर्गत असलेल्या सगळ्याच देशांना ही लस मिळू शकेल. यासाठी WHO नं दोन टप्प्यातील प्लॅन तयार केला आहे.

पहिल्या टप्प्यात सदस्य देशाच्या लोकसंख्येपैकी ३ टक्के लोकसंख्येला लसीचे डोस दिले जातील. त्यानंतर हे प्रमाण २० टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे.

लोकसंख्येच्या २० टक्के लोकांना लसीचा पुरवठा केल्यानंतरही वितरण पुरेसं नसल्यास फेज २ प्रोग्रामची सुरूवात होणार आहे. या अंतर्गत ज्या देशांमध्ये जास्त धोका आहे. त्या देशाला लसीचे डोस जास्त प्रमाणात पुरवले जातील. किती आणि कोणत्या लोकांना सगळ्यात आधी लस दिली जावी याचा निर्णय प्रत्येक देशानं घ्यायचा आहे.

Read in English