CoronaVirus Marathi News Maharashtra reports 11,921 new COVID19 cases 180 deaths today | CoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला

CoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला

मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र याच दरम्यान सातत्याने चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे. देशातील एकूण रुग्णांच्या संख्येने तब्बल 60 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 13 लाखांवर गेली असून आतापर्यंत 35 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सोमवारी (28 सप्टेंबर) कोरोनाचे 11,921 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 180 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 13,51,153 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 35 हजारांवर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 10,49,947 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनाच्या संकटात 'ही' आकडेवारी सुखावणारी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे 12 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र सोमवारी कोरोनाचे 11,921 रुग्ण आढळून आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांपैकी 2,65,033 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 10,49,947 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. 

बापरे! 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना; IIT रिसर्चमधून मोठा खुलासा

देशात कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्याही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 60 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांचा आकडा 60,74,703 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 82,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,039 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 95,542 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान देशात कोरोना कसा पसरला याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

दुबई आणि इंग्लंडमधून आलेल्या लोकांमुळे देशात पसरला कोरोना, रिसर्चमधून मोठा दावा

इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT) रिसर्चमधून कोरोनाबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारतात दुबई आणि इंग्लंडमधून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे समोर आले आहे. आयआयटीने आपल्या रिसर्चमधून हा दावा केला आहे. जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिनमध्ये हे प्रकाशित करण्यात आले आहे. भारतात कोरोना हा आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे देशातील विविध राज्यात पसरल्याचं यामध्ये म्हटलं आहे. आयआयटी, मंडीच्या सहाय्यक प्राध्यापक सरिता आझाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशोधकांना जागतिक स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर रोगाचा प्रसार होण्याचे कारण दिसून आले आहे. भारतात काही कोरोना सुपर स्प्रेडर्स म्हणजे मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रसार करणाऱ्यांची ओळख पटवण्यात आली आहे. ट्रॅव्हल हिस्ट्रीचा अभ्यास केला असता ही महत्त्वाची माहिती समोर आल्याचं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

चिमुकल्याला रुळावर ठेवून महिलेची मालगाडीसमोर उडी, तितक्यात पोलिसांची एंट्री अन्...

CoronaVirus News : भारीच! N95 मास्क पुन्हा वापरता येणार, शास्त्रज्ञांचा दावा; जाणून घ्या कसं?

CoronaVirus News : "मास्क न घालणारे किलर, मुंबईतील 2 टक्के लोक कळत-नकळत इतरांना मारण्याचं करताहेत काम"

"कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा, भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा"

CoronaVirus News : बापरे! 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना; IIT रिसर्चमधून मोठा खुलासा

English summary :
CoronaVirus Marathi News Maharashtra reports 11,921 new #COVID19 cases, 180 deaths and 19,932 discharges today. Total cases in the state rise to 13,51,153

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News Maharashtra reports 11,921 new COVID19 cases 180 deaths today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.