CoronaVirus Marathi News find way deplete n95 mask for reuse combining heat moisture | CoronaVirus News : भारीच! N95 मास्क पुन्हा वापरता येणार, शास्त्रज्ञांचा दावा; जाणून घ्या कसं?

CoronaVirus News : भारीच! N95 मास्क पुन्हा वापरता येणार, शास्त्रज्ञांचा दावा; जाणून घ्या कसं?

कोरोनाचा जगभरात कहर पाहायला मिळत आहे. जगभरात रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. अनेक ठिकाणी मास्क न वापरल्यास दंड भरावा लागत आहे. याच दरम्यान N95 मास्कबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटात N95 मास्कचा पुन्हा वापर करता येणार आहे. शास्त्रज्ञांनी यावर मार्ग शोधला आहे. 

कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असताना देखील एन 95 मास्कसारख्या संरक्षक उपकरणाच्या अभावामुळे आरोग्य कर्मचार्‍यांना त्यांचा पुनर्वापर करावा लागत आहे. मात्र आता शास्त्रज्ञांनी यावर तोडगा काढला आहे. एन-95 मास्कचा पुन्हा वापर करण्यासाठी उष्णता आणि आर्द्रतेचा वापर करून हे मास्क निर्जंतुकरण करण्याचा नवीन मार्ग शोधला आहे. ऊर्जा विभागाने एसएलसी नॅशनल एक्सिलिरेटरर लेबोरेटरी, स्टॅनफर्ड विद्यापीठ आणि युनिर्व्हिसिटी ऑफ टेक्सासच्या संशोधकांनी यावर संशोधन केले आहे. उच्च सापेक्ष आर्द्रतेमध्ये हळूहळू एन-95 मास्कला उष्णता दिल्यास त्याची गुणवत्ता खालावत नाही. तसेच मास्कमध्ये अडकून असलेला सार्स-कोव-2  व्हायरस निष्क्रिय होऊ शकतो. 

मास्कचे निर्जंतुकीकरण करणे शक्य

स्टॅनफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ स्टीवन चू यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही एक समस्या आहे. त्यामुळे मास्कचा पुन्हा वापर करण्याचा मार्ग शोधल्यास ही समस्या दूर होऊ शकते. अनेक डॉक्टर आणि नर्सजवळ एक डझनहून अधिक मास्काचा साठा झाला आहे. या नव्या पद्धतीमुळे कॉफी ब्रेकमध्ये देखील मास्कचे निर्जंतुकीकरण करणे शक्य आहे. मास्कचे निर्जुंतीकरण करण्यासाठी 100 टक्के सापेक्ष आर्द्रतेसह 25 ते 95 टक्के सेल्सियस तापमानावर 30 मिनिटे उष्णता" देण्यात आल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता

कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेकांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असतानाच चिंताजनक माहिती समोर आली आहे. जगभरात तब्बल 150 हून अधिक लसींवर काम सुरू आहे. मात्र कोरोनाची यशस्वी लस येण्याआधी जगभरात तब्बल 20 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनामुळे जगभरात 20 लाख मृत्यू होऊ शकतात अशी भीती WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. WHO चे इमर्जेंसी प्रोग्राम हेड माइक रायन यांनी ही चिंता व्यक्त केली. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संघटीत होऊन योग्य ती पावलं वेळवर उचलली गेली नाहीत तर मृतांचा आकडा हा 20 लाखांहून अधिक होऊ शकतो. कोरोनाच्या या संकटातून बाहेर पडणं थोडं कठीण आहे. नवे रुग्ण आढळून येत आहेत. घरामध्ये होणाऱ्या पार्टीमुळे देखील कोरोनाचा प्रसार होत असल्याचं माइक रायन यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : "मास्क न घालणारे किलर, मुंबईतील 2 टक्के लोक कळत-नकळत इतरांना मारण्याचं करताहेत काम"

"कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा, भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा"

CoronaVirus News : बापरे! 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना; IIT रिसर्चमधून मोठा खुलासा

कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक, ट्रॅक्टर पेटवून व्यक्त केला निषेध; Video व्हायरल

CoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता

English summary :
CoronaVirus Marathi News find way to deplete the n95 mask for reuse by combining heat and moisture

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News find way deplete n95 mask for reuse combining heat moisture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.