mumbai mayor kishori pednekar slams people who not wearing mask in corona | CoronaVirus News : "मास्क न घालणारे किलर, मुंबईतील 2 टक्के लोक कळत-नकळत इतरांना मारण्याचं करताहेत काम"

CoronaVirus News : "मास्क न घालणारे किलर, मुंबईतील 2 टक्के लोक कळत-नकळत इतरांना मारण्याचं करताहेत काम"

मुंबई - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 60 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र याच दरम्यान अनेक ठिकाणी मास्क न लावणे तसेच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. याच दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'कोरोना काळात मास्क न घालणारे किलर आहेत. मुंबईतील 2 टक्के लोक कळत-नकळत इतरांना मारण्याचं काम करताहेत' असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. 

"अनेक लोक गळ्यात चैन घालतात, गॉगल लावतात मात्र मास्कसाठी पैसे नाहीत, ही मानसिकता चुकीची आहे. मुंबईतील 2 टक्के अति आत्मविश्वास असलेले लोक 98 टक्के लोकांच्या जीवितास धोका निर्माण करत आहेत. मुंबईकर चांगले आहे. पण काही जणांमध्ये बेफिकरीपणा आहे. ज्यांच्या घरात मृत्यू होतो, त्याला याचा त्रास होतो आहे" असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. 'टीव्ही 9' या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना महापौरांनी असं म्हटलं आहे. 

"मास्क लावा अन्यथा कोरोनाला हरवायला खूप वेळ लागेल"

महापौरांनी "अनलॉकमध्ये सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क लावा अन्यथा कोरोनाला हरवायला खूप वेळ लागेल" असं देखील म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. ट्विटरवरून त्यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. 'मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली. कोणतीही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे. माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन,' अशी माहिती पेडणेकर यांनी दिली होती. 

राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर 2.7 पर्यंत घसरला!

राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असला, तरी सप्टेंबर अखेरपर्यंत मृत्युदर 2.7 टक्क्यांवर आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय, बरे होण्याचे प्रमाणही 76.9 टक्क्यांवर पोहोचले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्याचा मृत्यूदर 2.7 टक्क्यांवर आल्याने दिलासा मिळाला आहे. एप्रिलमध्ये हाच मृत्यूदर 12 एप्रिलला 7.5% झाला होता. मेपर्यंत मृत्यूदर 4 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यानंतर तो कमी झाला.

महत्त्वाच्या बातम्या

"कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा, भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा"

CoronaVirus News : बापरे! 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना; IIT रिसर्चमधून मोठा खुलासा

कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक, ट्रॅक्टर पेटवून व्यक्त केला निषेध; Video व्हायरल

CoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता

इटुकल्या पिटुकल्या उंदराने केली कमाल, मिळाला 'शौर्य' पुरस्कार; कामगिरी ऐकून व्हाल हैराण

 

English summary :
mumbai mayor kishori pednekar slams people who not wearing mask in corona

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mumbai mayor kishori pednekar slams people who not wearing mask in corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.