CoronaVirus News : बापरे! 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना; IIT रिसर्चमधून मोठा खुलासा

By सायली शिर्के | Published: September 28, 2020 01:33 PM2020-09-28T13:33:54+5:302020-09-28T13:46:43+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोना कसा पसरला याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

देशात कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्याही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 60 लाखांचा टप्पा पार केला आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांचा आकडा 60,74,703 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 82,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,039 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 95,542 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान देशात कोरोना कसा पसरला याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT) रिसर्चमधून कोरोनाबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारतात दुबई आणि इंग्लंडमधून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे समोर आले आहे.

आयआयटीने आपल्या रिसर्चमधून हा दावा केला आहे. जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिनमध्ये हे प्रकाशित करण्यात आले आहे. भारतात कोरोना हा आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे देशातील विविध राज्यात पसरल्याचं यामध्ये म्हटलं आहे.

आयआयटी, मंडीच्या सहाय्यक प्राध्यापक सरिता आझाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशोधकांना जागतिक स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर रोगाचा प्रसार होण्याचे कारण दिसून आले आहे.

भारतात काही कोरोना सुपर स्प्रेडर्स म्हणजे मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रसार करणाऱ्यांची ओळख पटवण्यात आली आहे. ट्रॅव्हल हिस्ट्रीचा अभ्यास केला असता ही महत्त्वाची माहिती समोर आल्याचं म्हटलं आहे.

दुबईहून 144 आणि इंग्लंडमधील 64 लोक हे सुरुवातीच्या काळात भारतात आले होते. देशात हेच लोक कोरोनाच्या संसर्गाचे प्राथमिक स्त्रोत बनल्याचा दावा रिसर्चमधून करण्यात आला आहे.

आझाद यांन दुबई आणि इंग्लंडमधून आलेल्या लोकांना भारतातील विविध राज्यात कोरोनाचा प्रसार करण्यात मुख्य भूमिका बजावल्याचं म्हटलं आहे. रिसर्च टीमने प्रामुख्याने जानेवारी ते एप्रिलपर्यंत कोरोना संक्रमित लोकांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली.

रिसर्चमध्ये दुबई आणि इंग्लंडमधून आलेल्या लोकांमुळे कोरोना पसरल्याचं स्पष्ट झाले असून तशी आकडेवारी समोर आली आहे. तामिळनाडू, दिल्ली आणि आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचा प्रसार झाला.

गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, जम्मू-कश्मीर आणि कर्नाटकमध्ये देखील या लोकांमुळे कोरोनाचा प्रसार झाल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनावर अनेक जण मात करत असतानाच रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

जगभरात तब्बल 150 हून अधिक लसींवर काम सुरू आहे. मात्र कोरोनाची यशस्वी लस येण्याआधी जगभरात तब्बल 20 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

कोरोनामुळे जगभरात 20 लाख मृत्यू होऊ शकतात अशी भीती WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. WHO चे इमर्जेंसी प्रोग्राम हेड माइक रायन यांनी ही चिंता व्यक्त केली.

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संघटीत होऊन योग्य ती पावलं वेळवर उचलली गेली नाहीत तर मृतांचा आकडा हा 20 लाखांहून अधिक होऊ शकतो.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, माइक रायन यांनी कोरोनाबाबतची ही भीती व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस समोर आल्यानंतर गेल्या नऊ महिन्यांमध्ये 9.93 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.