शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

CoronaVirus News : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 1:07 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हळूहळू उठवण्यास सुरुवात केली. मात्र पुन्हा लॉकडाऊन होणार अशा अफवा पसरल्या

मुंबई  - महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हळूहळू उठवण्यास सुरुवात केली. मात्र पुन्हा लॉकडाऊन होणार अशा अफवा पसरल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आता मोठा खुलासा केला आहे. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत असं म्हटलं आहे. गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या  पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे. 

उद्धव ठाकरे यांनी 'आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरू करत आहोत. पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही' असं म्हटलं आहे. तसेच बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्क्यांवर (४७.२ टक्के) आला असून, मुंबईतील धारावीतून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण येण्याची संख्या मंदावली आहे, तसेच राज्याचा मृत्यूदर ३.७ टक्क्यांवर आला आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात ३ हजार ६०७ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, दिवसभरात १५२ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या ९७ हजार ६४८ झाली असून, बळींचा आकडा ३ हजार ५९० वर गेला आहे. सध्या राज्यात ४७ हजार ९६७ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात दिवसभरात १ हजार ५६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर राज्यात आतापर्यंत एकूण ४६ हजार ७८ जण कोविडमुक्त झाले आहेत. मुंबईत गुरुवारी १,५४० रुग्णांची नोंद झाली. शहरातील वरळी, धारावी, वडाळा, भायखळा या विभागांत आता चित्र बदलले आहे. महापालिकेच्या ‘चेसिंग द व्हायरस’ या उपक्रमामुळे या विभागांमध्ये दररोज रुग्ण वाढण्याचा दर आता दोन टक्क्यांहून कमी आहे.केंद्र शासनाने कंटेन्मेंट झोनसाठी लागू केलेले निकष बदलावेत, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरची कमाल; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! कोरोनाचा भीतीदायक रेकॉर्ड; गेल्या 24 तासांत तब्बल 10,956 नवे रुग्ण

CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! 14 मृतदेहांचा 'तो' धक्कादायक Video व्हायरल

"आता आपल्याकडे मौनेंद्र मोदी आहेत ते..."; भारत-चीन सीमावादावरून पंतप्रधानांवर निशाणा

CoronaVirus News : बापरे! तब्बल 35 निगेटिव्ह लोकांना दिला कोरोनाचा 'पॉझिटिव्ह' रिपोर्ट अन्...

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्याला यश येणार, मांजरींवरील 'हे' औषध प्रभावी ठरणार?

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र