शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राज्यात कोरोनाचे २३ लाख ९५ हजार रुग्ण घरगुती अलगीकरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 10:15 IST

राज्यात शनिवारी १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १३ लाख ५८ हजार ६०६ रुग्ण कोविडमुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ८५.६५ टक्क्यांवर पोहोचला. राज्यात दिवसभरात १० हजार २५९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून २५० मृत्यूंची नोंद झाली. (CoronaVirus)

ठळक मुद्देराज्यात शनिवारी १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले.आतापर्यंत १३ लाख ५८ हजार ६०६ रुग्ण कोविडमुक्त झाले.रुग्ण बरे होण्याचा दर ८५.६५ टक्क्यांवर पोहोचला.

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने  घट होते आहे. तर दुसरीकडे अजूनही राज्यात २३ लाख ९५ हजार ५५२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २३ हजार ७४९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. राज्यात सध्या १ लाख ८५ हजार २७० सक्रिय रुग्णांवर उपचार 
सुरू आहेत.

राज्यात शनिवारी १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १३ लाख ५८ हजार ६०६ रुग्ण कोविडमुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ८५.६५ टक्क्यांवर पोहोचला. राज्यात दिवसभरात १० हजार २५९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून २५० मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५ लाख ८६ हजार ३२१ झाली असून बळींचा आकडा ४१ हजार ९६५ झाला आहे. राज्याचा मृत्युदर २.६५ टक्के आहे. 

मुंबईत कोरोनाचे २२,६६४ सक्रिय रुग्ण -
च्मुंबईत दिवसभरात कोरोनाचे २ हजार ९८८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ७ हजार ४७४ रुग्ण कोविडमुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर राज्याच्या बरोबरीने म्हणजेच ८६ टक्क्यंवर गेला आहे. मुंबईत कोरोनाचे २२,६६४ सक्रिय रुग्ण आहेत. 
च्मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ८६ दिवसांवर गेला आहे. शनिवारी १,७९१ कोरोना रुग्ण आढळले असून ४७ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ४० हजार ३३५ पोहोचली असून मृतांची संख्या ९,७३९ झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल