शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

CoronaVirus: चिंतेत भर! राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२९७ वर; एकट्या मुंबईत ८५७ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 12:51 PM

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १६२ नं वाढला असून यातील १४३ रुग्ण मुंबईतील आहेत. लोकसंख्येची घनता अतिशय जास्त असलेल्या भागांत कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. या भागातला कोरोनाचा संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांचा झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२९७ वर पोहोचला आहे. यातील ८५७ रुग्ण एकट्या मुंबईतले आहेत. राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण आढळले असून यापैकी १४३ मुंबईतले आहेत. तर जण कल्याण डोंबिवलीतले आहेत. याशिवाय पुणे, औरंगाबादमधील प्रत्येकी ३ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड, नवी मुंबईत कोरोनाचे प्रत्येकी २ नवे रुग्ण आढळून आलेत. याशिवाय ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार, यवतमाळ, सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.येत्या तीन-चार दिवसांत मुंबईतील रुग्णांच्या आकड्यात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज पालिका आयुक्त प्रवीण परदेशींनी वर्तवला आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा तीन ते साडे तीन हजारांवर जाईल. मात्र परिस्थिती नियंत्रणात असेल. ती हाताबाहेर जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दर दहा लाखांमागे साधारणत: ३०० कोरोनाचे रुग्ण सापडतील, असा माझा अंदाज आहे. जागतिक पातळीवर ही सरासरी १०० ते १५० इतकी आहे. मात्र फ्रान्स, इटलीमध्ये हाच आकडा १२०० च्या घरात असल्याची आकडेवारी त्यांनी सांगितली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस