शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

CoronaVirus Lockdown News: "चित्रीकरण बंद केले जाणार नाही; मात्र खबरदारी घ्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 2:42 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाइन बैठकीत निर्मात्यांसह चित्रपट महामंडळाला सूचना

पुणे : चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण बंद केले जाणार नाही, अशी ग्वाही देत चित्रीकरण कमीत कमी लोकांमध्ये करावे, गर्दी होईल अशी दृश्ये चित्रित करू नये, चित्रीकरणासाठी जागा निवडताना शक्यतो दाट लोकवस्तीची ठिकाणे टाळावीत व चित्रपट आणि मालिकेशी संबंधित सर्वांचे लसीकरण झाले आहे की नाही ते पाहावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी निर्मात्यांसह अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दिल्या आहेत.कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणाबाबत राज्य सरकारसमवेत कलाकार, निर्माते दिग्दर्शकांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी सांस्कृतिक क्षेत्रातील विविध युनियन, महामंडळाचे सदस्य, दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मात्यांशी चर्चा केली.सर्वांनी योग्य ती कायदेशीर परवानगी घेऊनच चित्रीकरण करावे, चित्रीकरण चालू असताना लोकेशन सोडून इतरत्र जाऊ नये, चित्रीकरणाची जागा सॅनिटाइज करावी, सेटवर आरोग्य तपासणी करावी, त्याची रोजची नोंद ठेवावी, कलाकार सोडून इतरांनी मास्क वापरणे बंधनकारक असण्यासह कलाकारांनीही आपला शॉट झाला की मास्क लावणे आणि चहा, नाष्टा, जेवण यासाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरावे, डॉक्टर सेटवर असणे आवश्यक आहे व कंटेन्मेंट झोनमधील व्यक्तीला चित्रीकरणाला बोलावू नये, अशा सूचना केल्याची माहिती अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.खबरदारी घेण्याची जबाबदारी सर्व निर्मात्यांची चित्रीकरणाच्या वेळी सर्व प्रकारची खबरदारी घेण्याची जबाबदारी सर्व निर्मात्यांनी घेतली पाहिजे व यावर विविध संघटनांनी लक्ष ठेवावे, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या