CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 08:31 PM2021-09-11T20:31:29+5:302021-09-11T20:36:28+5:30

CoronaVirus Live Updates Maharashtra reports 3,075 COVID19 infections : कोरोनाग्रस्तांची संख्या 64,94,254 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 49,796 वर पोहोचला आहे. तब्बल 63 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

CoronaVirus Live Updates Maharashtra reports 3,075 fresh #COVID19 infections and 35 deaths today | CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी

googlenewsNext

मुंबई : सणाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल झाल्याने सार्वजनिक ठिकाणी लोकांचा वावर वाढला आहे, शिवाय बाजारपेठाही हाऊसफुल्ल झाल्या आहेत. परिणामी, मुंबई मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख चढता आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होताना दिसून येत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. याच दरम्यान महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. दिलासादायक आकडेवारी समोर आली असून राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, तसेच कोरोना मृतांचा आकडाही कमी झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी (11 सप्टेंबर) कोरोनाचे 3,075 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 35 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 64,94,254 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 49,796 वर पोहोचला आहे. तब्बल 63 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 63,02,816 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 16,672 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 3,056 लोक बरे झाले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

बापरे! कोरोनानंतर कोणतीही लक्षणं न दिसता 70 टक्के काम करणं बंद करतेय किडनी; रिपोर्टमधून खुलासा

कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांची चिंता वाढली आहे. त्यांना आरोग्य विषयक अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. रिसर्चमधून नवनवीन माहिती सातत्याने समोर येत आहे. अशीच धडकी भरवणारी माहिती आता पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनातून बरं झाल्यावर किडनीवर परिणाम होत असल्याची माहिती मिळत आहे. कोणतीही लक्षणं न दिसता किडनी 70 टक्के काम करणं बंद करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. जर्नल ऑफ दी अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (Journal of the American Society of Nephrology) या जर्नलमध्ये या नव्या संशोधनाबद्दलचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात जावं लागलेल्या किंवा कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणं दिसलेल्या रुग्णांनाही किडनीशी संबंधित समस्या जाणवत असल्याचं दिसून आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. कोरोना संसर्ग होऊन त्यातून बऱ्या झालेल्या रुग्णांना या समस्या जाणवत असल्याचं म्हटलं आहे.

समस्यांवर लवकर उपचार केले गेले नाहीत, तर किडनीचा गंभीर विकार होऊ शकतो, असा इशाराही रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. किडनी निकामी झाली, तर शरीरातल्या अन्य अवयवांवरही विपरीत परिणाम होतो, असं अनेक विशेषज्ञांनी म्हटलं आहे. समस्यांवर लवकर उपचार केले गेले नाहीत, तर किडनीचा गंभीर विकार होऊ शकतो, असा इशाराही रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. किडनी निकामी झाली, तर शरीरातल्या अन्य अवयवांवरही विपरीत परिणाम होतो, असं अनेक विशेषज्ञांनी म्हटलं आहे. आपली किडनी योग्य पद्धतीने काम करत नाहीये किंवा तिची कार्यक्षमता कमी झाली आहे, हे जवळपास 90 टक्के जणांना माहितीच नसतं, असं संशोधकांनी केलेल्या माहितीच्या विश्लेषणानंतर लक्षात आलं. कारण त्याबद्दलची लक्षणं दिसून येत नाहीत.

Web Title: CoronaVirus Live Updates Maharashtra reports 3,075 fresh #COVID19 infections and 35 deaths today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.