शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus फक्त दिवे बंद करा, अन्यथा...; महापारेषणचे कळकळीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 07:16 IST

देशातील विजेची मागणी अचानक १२ ते १३ हजार मेगावॅटने कमी होण्याची शक्यता आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील विजेचे दिवे बंद करून दीपप्रज्वलन करण्याचे आवाहन देशातील जनतेला केले आहे. या वेळी केवळ घरातील विजेचे दिवेच ९ मिनिटांसाठी बंद करा. पंखा, फ्रीज, टीव्ही, कॉम्प्युटर्स यांसारखी अन्य उपकरणे सुरू ठेवा. घराचा किंवा गृहनिर्माण सोसायटीचा संपूर्ण वीजपुरवठा बंद करू नका. शहरांतील पदपथांवरील दिवे अखंड सुरू राहतील. हॉस्पिटलसह सर्व अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापना, पालिकांची कार्यालये, पोलीस स्टेशन आदी ठिकाणचे दिवे बंद करू नका, असे आवाहन महापारेषणकडून करण्यात आले आहे.

हे करताना देशातील विजेची मागणी अचानक १२ ते १३ हजार मेगावॅटने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॉवर ग्रीडमध्ये बिघाड होऊन देश अंधारात बुडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, ती निरर्थक असून नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरने ग्रीड नियंत्रणासाठी आवश्यक ती कार्यप्रणाली निश्चित केली आहे. त्यानुसार राज्या-राज्यातील लोड डिस्पॅच सेंटर्सला सूचना दिल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकांनी घरातील विजेची सर्व उपकरणे बंद केल्यास विजेचा वापर अपेक्षेपेक्षा आणखी कमी होऊन त्या स्थितीत नियोजन बिघडू शकते. त्यामुळे केवळ घरांतील दिवेच बंद करावेत, असे आवाहन केले जात आहे.

ही काळजी घ्यासॅनिटायझरमध्ये काही प्रमाणात ज्वालाग्राही अल्कोहोल असते. त्यामुळे रविवारी रात्री मेणबत्ती किंवा दिवा पेटविताना हाताला सॅनिटायझर लावलेले नाही याची खात्री करा. दिवे लावण्यापूर्वी शक्यतो हात साबणाने धुतलेले असतील किंवा सॅनिटायझर अल्कोहोलमुक्त असेलयाची खबरदारी घ्या.

टॅग्स :mahavitaranमहावितरणNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या