शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
13
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
14
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
15
‘डोंट यू अंडरस्टँड? गेट आउट फ्रॉम हिअर!’ रस्ता मोकळा करा! ‘जेन-झी’ने हातात घेतलेले नवे शस्त्र
16
‘अमेरिकन ड्रीम’चा पोपट मेला असे म्हणायचे का?; भारताला बसणार सर्वाधिक फटका, कारण...
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सरकार कारवाई करणार नसेल तर राज्यपालांकडे बैठक लावू- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 18:38 IST

CoronaVirus : राज्यपालांशी बोललो व सरकार कारवाई करणार नसेल तर राज्यपालांकडे बैठक लावतो असे सांगितले. राज्यपालांनी देखील बैठक बोलावण्याची तयारी दर्शवली.

मीरा रोड - उच्च न्यायालयाने सांगून देखील आदिवासींबाबतच्या निर्णयावर अमल होत नसेल तर राज्य सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सरकार जर कारवाई करणार नसेल तर राज्यपालांकडे बैठक बोलावू असे ते म्हणाले. श्रमजीवी संघटनेने संस्थापक विवेक पंडित यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी ते वरसावे नाका येथे आले होते. कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येकास अन्नधान्य मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज दिले. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही वा अंत्योदयचा शिक्का नाही अशा लोकांपर्यंत धान्य पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने यंत्रणा उभारली पाहिजे होती, जी दुर्दैवाने झाली नाही. आदिवासींच्या समस्येबाबत पंडित हे आपल्याशी सतत चर्चा करत होते. मी स्वत: मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली. राज्यपालांशी बोललो व सरकार कारवाई करणार नसेल तर राज्यपालांकडे बैठक लावतो असे सांगितले. राज्यपालांनी देखील बैठक बोलावण्याची तयारी दर्शवली.पण आंदोलनाने सरकार जागे झाले आहे. आता सचिव नेमले आहेत. सरकारकडून कदाचित दोन गोष्टी कमी मिळाल्या तरी आंदोलन मागे घ्या. जे काही राहिले असेल त्यासाठी राज्यपालांकडे मी पुढाकार घेऊन बैठक लावून घेऊ.  सरकारने पुढाकार घेतला तर मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊ असे ते म्हणाले . अधिका-यांच्या भरवशावर आदिवासींचे प्रश्न सुटू शकत नाहीत. अन्यथा इतक्या वर्षात ते सुटले असते अशी टीका फडणवीस यांनी प्रशासनावर केली. आदिवासींचे प्रश्न सुटावे म्हणून पंडित यांना आढावा समितीचे अध्यक्षपद दिले. पंडित यांनी तयार केलेला अहवाल लागू करण्यासाठी प्रयत्न करू. सर्व विषय राज्यपालांपर्यंत पोहोचवू. सरकार जागे झाले आहे त्यामुळे पंडित यांनी उपोषण सोडावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते.पंडित यांच्याकडून फडणवीस यांचे कौतुक तर ठाकरे सरकारवर टीकाफडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा आपणास आंदोलन करावे लागले नाही. आता ते विरोधी पक्षनेते असून देखील सरकार विरोधातील आंदोलन उलट लवकर कसे संपेल ते सांगा, अशी भूमिका त्यांनी घेतली असे सांगत पंडित यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. तर आताच्या सरकारने आदिवासींना मिठासाठी एक रुपया देखील दिला नाही, अशी टीकेची झोड उठवत सरकारला सदबुद्धी मिळावी असे ते म्हणाले.

हेही वाचा

ATKT असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांना नापास करणार का?, शेलारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus News: छोट्या व्यावसायिकांना मोठा आधार; MSMEsसाठी सरकारकडून 20000 कोटींच्या पॅकेजची घोषणा

CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी

परदेशी वस्तूंना आता बाय बाय; भारतात पॅरामिलिट्री कँटीनमध्ये मिळणार फक्त स्वदेशी उत्पादनं

लडाख सीमेजवळ चिनी फायटर जेटच्या घिरट्या; 'ड्रॅगन'च्या कुरापतींवर भारताची नजर

धक्कादायक... वडिलांनीच पोटच्या तीन लहान मुलींना नदीत फेकून दिलं

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस