Shocking ... The father threw the three little girls in the river in UP MMG | धक्कादायक... वडिलांनीच पोटच्या तीन लहान मुलींना नदीत फेकून दिलं

धक्कादायक... वडिलांनीच पोटच्या तीन लहान मुलींना नदीत फेकून दिलं

लखनौ - उत्तर प्रदेशमधील संत कबीर नगर जिल्ह्यातील धनघटा येथे घरगुती वादातून चक्क वडिलांनी आपल्या मुलींना जीव घेतला आहे. माथेफिरू पित्याने पोटच्या तीन मुलींना घागरी नदीत फेकून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत, पोलीस अधीक्षक बृजेशसिंह यांनी सांगितले की, सर्फराज नावाच्या व्यक्तीने आपले मित्र नीरज यांच्या मदतीने दुचाकीवरुन आपल्या मुलींना घागरा नदीकिनारी पोहोचवले. त्यानंतर, तिन्ही मुलींना नदीत फेकून दिले. 

सर्फराज यांनी आपल्या सना (७), सबा (४) आणि शमा (२) या तिन्ही मुलींना घागरा नदीच्या बिरहर घाटावर आणले, त्यानंतर तिन्ही मुलींना एक-एक करत नदीत फेकून दिले. त्यावेळी, जवळील काही स्थानिक ग्रामस्थांनी मुलींना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, या सर्वांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. याबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नाविकांच्या मदतीने मुलींचा शोध सुरु केला आहे. मात्र, अद्याप एकही मुलगी सापडली नाही. याप्रकरणी पोलिसांनी सर्फराज आणि त्याचा मित्र नीरज यास ताब्यात घेतलं आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईत असलेला सर्फराज २० दिवसांपूर्वीच गावी उत्तर प्रदेशात आला होता. सर्फराजला दारुचे व्यसन होते, त्यातून घरगुती वाद निर्माण होत. याप्रकरणातही घरगुती वाद असल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांचा तपास सुरु आहे. 

Web Title: Shocking ... The father threw the three little girls in the river in UP MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.