coronavirus: Health Minister Rajesh Tope says, 15 corona patients discharged | coronavirus : राज्यातील 15  कोरोनाबधित रुग्णांना डिस्चार्ज, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

coronavirus : राज्यातील 15  कोरोनाबधित रुग्णांना डिस्चार्ज, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई - राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत 15 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. मुंबईत 1 आणि ठाणे येथे 1 नवा रुग्ण आढळून आला आहे. काल पुण्यात दोघा कोरोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान,  सद्यस्थितीत राज्यातील कोरोनाचे संकट अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असताना मृतांचा आकडाही हळुहळू वाढू लागला आहे. वाशी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने राज्या कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चार झाली आहे. 

 राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. काल सांगली, मुंबई, पनवेल आदी भागात कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या रुगणांचा आकडा 124  वर पोहोचला आहे.

देशामध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आले. तर महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये आतापर्यंत 112 रुग्ण आढळले आहेत. तर देशभरात एकूण कोरोनाबधितांची संख्या 600 च्या पुढे पोहोचली आहे. तर आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे.

 

English summary :
Health Minister Rajesh Tope says, 15 corona patients discharged

Web Title: coronavirus: Health Minister Rajesh Tope says, 15 corona patients discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.