Coronavirus Lockdown: राज्यात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 13:26 IST2021-04-10T13:25:07+5:302021-04-10T13:26:53+5:30
राज्यात कोरोना संक्रमक रोखण्यासाठी ठाकरे सरकारनं ३० एप्रिलपर्यंत वीकेंड लॉकडाऊन लावला आहे. त्याचसोबत नाईट कर्फ्यूसारखी विविध निर्बंध लावले आहेत. तरीही राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्येत घट होताना दिसत नाही.

Coronavirus Lockdown: राज्यात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
मुंबई – महाराष्ट्रात कोरोना संक्रमणामुळे परिस्थिती भयंकर होऊ लागली आहे. दिवसाला राज्यात ५० हजारांपेक्षा कोरोना रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत घोषणा होऊ शकते.
राज्यात कोरोना संक्रमक रोखण्यासाठी ठाकरे सरकारनं ३० एप्रिलपर्यंत वीकेंड लॉकडाऊन लावला आहे. त्याचसोबत नाईट कर्फ्यूसारखी विविध निर्बंध लावले आहेत. तरीही राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्येत घट होताना दिसत नाही. अशातच सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची मागणी करत आहेत.
महाराष्ट्रात ३ आठवड्यांसाठी लॉकडाऊन
राज्य सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात ३ आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वीकेंड लॉकडाऊनने काही होणार नाही. संक्रमण रोखण्यासाठी आपल्याला प्रत्येक पाऊल उचलणं गरजेचे आहे. त्याचसोबत राज्यात आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ नये यासाठी पदवीत्तर करणाऱ्या ५ लाख डॉक्टरांनाही सेवेत घेण्याबाबत आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान, कम्युनिटी स्तरावर संक्रमण पसरणे आणि लोकांचे मृत्यू रोखण्यासाठी ट्रेन आणि सार्वजनिक ठिकाणी बंदी यावर निर्बंध आखायला हवेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री या नात्याने मी फक्त वीकेंड लॉकडाऊन नको तर ३ आठवड्यापर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लावावा अशी मागणी करतो. कम्युनिटी स्प्रेड रोखण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे गरजेचे आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
सर्वपक्षीय बैठक
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी राज्यात MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबतही बैठकीत निर्णय झाला आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्यापूर्वी छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे असं प्रविण दरेकर म्हणाले.