Coronavirus : चिंताजनक! महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 2455 वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 14:07 IST2020-04-14T13:57:46+5:302020-04-14T14:07:26+5:30
Coronavirus : भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

Coronavirus : चिंताजनक! महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 2455 वर
मुंबई - कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 9000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसागणिक वाढत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2455 वर पोहोचली आहे. मुंबईत 92, नवी मुंबईत 13, रायगडमध्ये 1, ठाण्यात 10, वसई-विरारमध्ये 5 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. तर रत्नागिरीतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रत्नागिरीत अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी साखरतर येथील 6 महिन्यांच्या बाळाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित महिलेच्या घरातील हे बाळ असून यामुळे रत्नागिरीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता रत्नागिरीत कोरोना रुग्णांची संख्या 6 वर जाऊन पोहचली आहे.
#IndiaFightsCorona ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.
— Lokmat (@MiLOKMAT) April 14, 2020
संपूर्ण बातमीसाठी क्लिक करा-https://t.co/iDeLXixiLfpic.twitter.com/zoW5HSlD0D
वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 119,718 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1,925,528 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 452,177 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
Coronavirus : कोरोना आता लपू शकणार नाही, 'हे' सॉफ्टवेअर फक्त काही सेकंदात शोधणार, वैज्ञानिकाचा दावाhttps://t.co/FacCEZkamp#CoronaUpdatesInIndia#technology#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 14, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : धक्कादायक! रत्नागिरीत सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण
Coronavirus : कोरोना आता लपू शकणार नाही, 'हे' सॉफ्टवेअर फक्त काही सेकंदात शोधणार, वैज्ञानिकाचा दावा
Coronavirus : लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन जेवण मागवणं पडलं महागात, बसला तब्बल 50 हजारांचा फटका
Coronavirus : भाषणाआधी पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले...
Coronavirus : 'देशाला स्मार्ट उपायांची गरज', राहुल गांधींचा मोदींना सल्ला