शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

CoronaVirus: राज्यात २४ तासांत ७७८ नवे रुग्ण; एकूण बाधितांचा आकडा ६,४२७ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 5:45 AM

बळी २८३ वर, मुंबईची रुग्णसंख्या ४ हजार २०५

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती भीषण होतेय, लॉकडाउन असूनही राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतो आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात ७७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, हे आतापर्यंतचे राज्यातील सर्वाधिक निदान आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६,४२७ झाली आहे. राज्य शासनासमोरचे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान अधिक कठीण होत आहे. राज्यात गुरुवारी १४ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा २८३वर पोहोचला आहे. मुंबईत गुरुवारी ४८७ इतके रुग्णाचे निदान झाले असून, रुग्णसंख्या ४ हजार २०५ झाली आहे. मुंबईत गुरुवारी सहा जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १६७ झाली आहे.राज्यात गुरुवारी सर्वाधिक कोरोना रुग्णांचे निदान झाले, यापूर्वीही १९ एप्रिल रोजी राज्यात एकाच दिवशी ५५२ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात गुरुवारी १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, त्यात मुंबईतील सहा, पुणे येथील पाच, नवी मुंबई, नंदुरबार आणि धुळे मनपा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. १४ मृत्यूंपैकी आठ पुरुष, तर सहा महिला आहेत. गुरुवारी झालेल्या मृत्यूंमध्ये ६० व त्यावरील दोन रुग्ण आहेत. तर नऊ रुग्ण हे ४० ते ५९ वयोगटातील आहेत. तीन रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. दोन रुग्णांबाबत अन्य आजारांची माहिती मिळू शकली नाही. उर्वरित १२ मृत्यूंपैकी सात रुग्णांमध्ये ५८ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आहेत.पुणे विभागात १३५ रुग्णांची वाढविभागातील बाधितांची संख्या १ हजार ३१ झाली. बुधवारपेक्षा १३५ ने बाधित रुग्णसंख्या वाढली आहे. गुरुवारी दिवसभरात ४ जण मृत्युमुखी पडले. मृतांची एकूण संख्या ६५ झाली. १७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उपचार सुरू असलेले रुग्ण ७९४ आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३ रुग्ण गंभीर आहेत.मालेगाव शंभरीपार; नव्या बाधितांची नोंदनाशिक : मालेगावात गुरुवारी (दि.२३) आणखी ५ पॉझिटिव्ह आढळल्याने रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. आतापर्यंत सुमारे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यानंतर पॉझिटिव्ह रु ग्णांचे शतक पूर्ण करणारा मालेगाव पहिला तालुका ठरला आहे.विदर्भात १७१ रुग्णविदर्भातही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी नऊ जण आढळले. या जिल्ह्यात आतापर्यंत २७ रुग्णांची नोंद झाली. विदर्भात ही संख्या १७१ वर पोहोचली. सात दिवस रुग्णांची नोंद होणाऱ्या नागपुरात गुरुवारी एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.वह्या पुस्तकांची तसेच पंखे व विजेची दुकाने उघडणारदेशातील काही राज्यांत लॉकडाउन उठल्यानंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आणि वाढता उन्हाळा यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने वह्या-पुस्तकांची तसेच पंखे व काही विजेच्या उपकरणांची दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे.याशिवाय शेतीसाठी लागणारी उपकरणे, बियाणे, खते यांची दुकानेही सुरू होतील. यामुळे शालेय विद्यार्थी तसेच पालकांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांनाही त्यांची कामे सुरु करता येतील.२६.९ लाख रुग्ण जगातजगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या २६ लाख ७५ हजार ८७६ झाली असून, मृतांचा आकडाही १ लाख ८८ हजार ८०४ वर गेला आहे. या आजारातून ७ लाख ३९ हजार जण बरे झाले असून, इतरांवर उपचार सुरू आहेत. अमेरिका (४७,८०८), इटली (२५,०००), स्पेन (२२ हजार ) आणि फ्रान्स २१ हजार ) या देशांत कोरोनाच्या बळींची संख्या मोठी आहे.२३,०३९ रुग्ण देशात, ७२१ मृत्यूदेशात आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २३ हजार ३९ झाली असून, त्यापैकी ५०१२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र या आजाराने ७२१ जण मृत्युमुखीही पडले आहेत. सुमारे १६ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस