शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Coronavirus : धोका वाढला! महाराष्ट्रात 117 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 2801 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 4:01 PM

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 11,000 च्या वर गेला आहे.

मुंबई - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 11,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 350 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 2801 वर पोहोचली आहे. बुधवारी ( 15 एप्रिल) राज्यात 117 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील तब्बल 66 नव्या रुग्णांचा समावेश आहे. तर पुण्यातही कोरोनाचे आणखी 44 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे. आज मुंबईत 66, ठाण्यात 3, वसई-विरार आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एक, मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता वाढली आहे. 

देशात आणि जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे. देशात 1000 तर जगात 4,86,247  जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. भारतात आतापर्यंत 1000 हून अधिक जणांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जगात 4,86,247 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1,27,147 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 20 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 20,08,164 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 4,86,247 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : परिस्थिती गंभीर! जगभरात कोरोनाचे तब्बल 1,27,147 बळी, रुग्णांची संख्या 20 लाखांवर

Coronavirus : वायू दुर्घटनेतून बचावले; पण 'त्या' 5 जणांना कोरोनाने गाठले

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी कर्नाटक करतंय 'या' तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य मंत्रालयाने केलं कौतुक

Coronavirus : दिलासादायक! देशात 1000 तर जगात 4,78,932 जणांनी केली कोरोनावर मात 

Coronavirus : लय भारी! 'या' देशात ATMमधून पैसे नाही तर तांदूळ काढता येणार

Coronavirus : अमेरिकेने WHO वर केला गंभीर आरोप, घेतला मोठा निर्णय

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईthaneठाणेPuneपुणे