शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

Corona virus : कोरोनाशी दिवसरात्र लढताना पोलिसांना पण हवे " विमा कवच "

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 13:40 IST

कोरोना विषाणूविरोधातल्या या लढ्यात रस्त्यावरच्या पोलिसांनाच या विषाणूने गाठले तर काय, याचे उत्तर मात्र समाधानकारक नाही.

ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे द्या सुरक्षा योजना कामांचे तास कमी करण्याची मागणी  

कल्याणराव आवताडे - पुणे : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन, चेहऱ्याला मास्क लावून पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेल्या हद्दीत गेल्या आठवडाभरापासून नाकाबंदी करीत आहेत. ही नाकाबंदी कोण्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी किंवा दंगेखोरांना आळा घालण्यासाठी नाही. पोलिसांचा यावेळचा लढा एका न दिसणाºया विषाणूविरोधात आहे. या विषाणूचा संसर्ग पसरू नये, म्हणून नागरिकांना रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी पोलीस रस्त्यावर उभे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ज्या विषाणूच्या उद्रेकाला महामारी जाहीर केले, त्या विषाणूविरोधात लढताना पोलीस मात्र कोणतेही कवच न घेताच लढत आहेत. कोरोना विषाणूविरोधातल्या या लढ्यात रस्त्यावरच्या पोलिसांनाच या विषाणूने गाठले तर काय, याचे उत्तर मात्र समाधानकारक नाही.कारण कोरोनाने गाठल्यानंतर मृत्यू झाल्यास कुटुंबाला साह्य करणारे कवच नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोनाविरोधात लढणाºया आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाने नुकतेच ५० लाखाचे विमा कवच जाहीर केले. इतर आवश्यक वैद्यकीय साधनेही त्यांना दिली गेली आहेत. कोरोनाविरोधात लढणाऱ्या पोलिसांनाही हे संरक्षण मिळावे, अशी पोलिसांची अपेक्षा आहे. कोरोना साथ पसरू नये, म्हणून रस्त्यावर असणाºया पोलिसांनाही कोरोनाच्या संसर्गाची भीती आहे. तरीही ही मंडळी अहोरात्र रस्त्यावर आहेत. यासंदर्भातील व्यथा पोलिसांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. कोरोनाजन्य साथ आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधानांनी राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही अनेक नागरिक बिनकामाचे रस्त्यावर येत आहेत. या रिकामटेकड्यांना आवरण्यासाठी पोलिसांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. मात्र कर्तव्य बजावत असताना कोरोनापासून वाचण्यासाठी कापडी मास्कशिवाय पोलिसांकडे काहीच नाही. कोरोनाची लागण एखाद्या पोलिसाला झाल्यास, ती त्याच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबीयांपर्यंत, पोलीस वस्त्यांमध्येही पोहोचण्याचा धोका आहे. काही विपरित घडल्यास त्याला विम्याचे संरक्षण आवश्यक आहे.कोरोनाबाधित अथवा संशयित अशा सर्व व्यक्तींशी आम्हा पोलिसांचा थेट संपर्क होत असल्याने आम्हाला विमा कवच आवश्यक असल्याची भावना एका पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली. त्यांनी सांगितले, की सध्या पोलीस महत्त्वाच्या चौकात, रस्त्यावर नाकाबंदी करून नागरिकांची चौकशी करून मगच त्यांना सोडतात. आम्ही पोलीस घरी गेल्यावर मात्र वेगळ्या खोलीत राहतो. वेगळे जेवतो कारण आमच्यामुळे आमचे कुटुंबीय धोक्यात येण्याची भीती असते, असे पोलिसांनी सांगितले........................कामांचे तास कमी करण्याची मागणी  कोरोना विषाणूला रोखण्यासाठी दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी विशेष सेल आणि गुन्हे शाखेसह सर्व युनिटममधील ५० आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना रजेवर पाठविण्याचे आदेश दिले. पुढील आदेश येईपर्यंत त्यांना घरीच विश्रांती घेण्यास सांगितले.  युनिटमधील उर्वरित पोलिसांनी अत्यंत काळजी घेऊन १०-१० दिवस वैकल्पिक कर्तव्य बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या. म्हणजेच, एक पोलीस महिन्यात २० दिवस ड्यूटी करेल. तसेच पोलीस ठाण्यांमध्ये तैनात असलेल्या २५ टक्के पोलिसांना रजा देण्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यामध्ये लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस अधिकाऱ्यांना सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत नाकाबंदी देण्यात आली आहे. यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कामांचे तास कमी करून दिल्ली पोलिसांच्या धर्तीवर पुण्यातही पोलिसांच्या कामाचे नियोजन करावे, अशी मागणी पोलिसांनी ‘लोकमत’कडे केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAnil Deshmukhअनिल देशमुखdoctorडॉक्टरFamilyपरिवार