शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थतेमागे सहकाराचे राजकारण

By admin | Updated: October 27, 2014 02:47 IST

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सरचिटणीस पदाचा राजीनामा देणारे मनसे नेते प्रवीण दरेकर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सरचिटणीस पदाचा राजीनामा देणारे मनसे नेते प्रवीण दरेकर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरेकर मनसेत अस्वस्थ असल्याची चर्चा असली तरी या अस्वस्थतेमागे मुंबईतील ‘सहकार’ क्षेत्रातील राजकारण कारणीभूूत असल्याची चर्चा आहे. मनसेच्या सर्व माजी आमदारांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर अशा मनसेतील दिग्गजांनाही मतदारांनी साफ नाकारले. मनसेच्या पहिल्या फळीतील नेते व मुंबै बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात वावरणारे दरेकर मागाठाणे मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. निकालानंतर दरेकर अस्वस्थ असून, मनसेला सोडचिठ्ठी देण्याच्या मन:स्थितीत असल्याचे बोलले जात होते. त्यातच आमदारांच्या निष्क्रियतेचा पक्षाला फटका बसल्याचा दावा बाळा नांदगावकरांनी केला. ही टीका जिव्हारी लागल्याने दरेकरांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. नांदगावकरांचा आरोप फेटाळताना आपण मतदारसंघात जनतेची कामे केल्याचा दावा दरेकरांनी केला. यासंदर्भात राज ठाकरेंची भेट घेत आपली बाजूही मांडली.भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर आपण अद्याप मनसेतच असल्याची प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे. मात्र ते भाजपा नेत्यांच्या संपर्कात असून, वाटाघाटी चालू आहेत. मुंबै बँक, मजूर फेडरेशनच्या माध्यमातून दरेकर सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. आमदारकीच्या काळात दरेकरांनी अन्य पक्षांतील नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांशी असलेली त्यांची जवळीक चर्चेचा विषय ठरली होती. गेल्या काही काळात मुंबै बँकेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आले, तर मजूर फेडरेशनबाबतही तक्रारी आहेत. सहकारातील आपले अस्तित्व राखण्यासाठीच भाजपा प्रवेशाची धडपड चालू असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)