शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सहकारातील भ्रष्टाचार निपटून काढू

By admin | Updated: November 4, 2014 03:21 IST

सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार संपविणे सहज शक्य आहे. त्यासाठी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर मी करणारच

विश्वास पाटील, कोल्हापूरसहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार संपविणे सहज शक्य आहे. त्यासाठी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर मी करणारच, अशी ग्वाही सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिली.भाजपाचे चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे कोल्हापुरात जल्लोष आहे. मंत्रिपदाची शपथ घेऊन येथे आल्यापासून येथील संभाजीनगर परिसरातील पाटील यांच्या निवासस्थानी नेते व कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. सत्कार स्वीकारत असतानाच त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.प्रश्न - राज्यातील सहकार चळवळ मोडीत निघाली आहे. तिला संजीवनी देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार?पाटील - सहकारामुळेच ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट झाला. सहकार चांगलाच आहे, परंतु त्यातील अपप्रवृत्ती व भ्रष्टाचारामुळे ही चळवळ बदनाम झाली. सहकारातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यास माझे प्राधान्य राहील. त्यासाठी कायद्यात बदल करावा लागेल. मागच्या सरकारने सहकार कायद्यात जे आपल्याला सोयीचे आहेत असेच काही बदल केले. जाणीवपूर्वक काही त्रुटी राहतील अशी व्यवस्था सरकारनेच केली होती. हे बदल कायद्यानेच दुरुस्त करावे लागतील. राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई करणार का?- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ५२ माजी संचालकांना गैरव्यवहारप्रकरणी नोटिसा पाठविल्या आहेत. ही कारवाई चालूच राहील. कोण माजी मंत्री व कोण मोठे नेते आहेत, याचा विचार करणार नाही. सहकारातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे काय?- सहकारी संस्थांमध्ये मुख्यत्वे अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच गैरव्यवहार होत असतात. तर काही अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी गैरव्यवहाराकडे केलेला कानाडोळाही त्यास कारणीभूत असतो. त्यामुळे राज्य बँकेच्या संचालकांवर तरी आम्ही कारवाई करूच, तेथील अधिकारीही त्यामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. सहकार खात्यात तुम्हाला कोणते बदल अपेक्षित आहेत?- सहकार खात्यात नेमके काय बदल करायला हवेत, याचा अभ्यास आम्ही सुरू केला आहे. त्यासंबंधीचे प्रस्ताव सहकार खात्यातील चांगले अधिकारी आणि तज्ज्ञांकडून मागवले आहेत. सहकार सुधारावा अशी अपेक्षा बाळगणारे व काही चांगले सुचवू पाहणारे अनेक अभ्यासू लोकआमच्या संपर्कात आहेत. त्यांचीही मदत घेऊ.