शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सहाव्या ज्योतिर्लिंगावरुन वाद; आसाम सरकारच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 13:21 IST

आसाम सरकारने त्यांच्या राज्यात सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे.

पुणे: संपूर्ण भारतात 12 ज्योतिर्लिंग म्हणजेच भगवान शंकराची प्रमुख मंदिरे आहेत. पण, आसाम सरकारच्या एका दाव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. आसाम सरकारने सहाव्या ज्योतिर्लिंगाबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काँग्रेसने आसाम सरकारवर जोरदार टीका केली. 

नेमका काय वाद?आसाम सरकारच्या पर्यटन विभागाने एक जाहिरात काढली आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला की, देशातील सहावे ज्योतिर्लिंग राज्याच्या डाकिनी टेकडीवर वसलेले आहे. ही जाहिरात येताच महाराष्ट्राचे राजकारण तापले. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी ट्विट करुन आसाम सरकारचा समाचार घेतला. मूळात, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असलेले ज्योतिर्लिंग हे देशातील सहावे ज्योतिर्लिंग म्हणून आधीच ओळखले जाते.

भाजपला शंकर हिसकावून घ्यायचेसावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, भाजपला महाराष्ट्रातून भगवान शंकर हिरावून घ्यायचे आहे. आता आसामच्या भाजप सरकारने दावा केला आहे की, भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. आसाम सरकारच्या या दाव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाराष्ट्र सरकारने या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. आसाम सरकारवर कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

 

आध्यात्मिक वारशाची चोरीदरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत आसाम सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही न ठेवण्याचा भाजप नेत्यांचा निर्धार आहे का? आधी महाराष्ट्रातील उद्योग आणि रोजगार चोरीला गेला आणि आता आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा चोरीला जाणार आहे….! असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

टॅग्स :AssamआसामMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेBhimashankarभीमाशंकरBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस