शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून हंगामी, कंत्राटी कामगार हद्दपार

By admin | Updated: August 11, 2015 03:12 IST

कंत्राटी कामगारांच्या भरवशावर चालणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा डोलाराही दोलायमान झाला आहे. हंगामी आणि कंत्राटी पद्धतीनेही कामगारांची नियुक्ती करू नये, असा आदेश प्राधिकरणाच्या

-  विलास गावंडे,  यवतमाळकंत्राटी कामगारांच्या भरवशावर चालणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा डोलाराही दोलायमान झाला आहे. हंगामी आणि कंत्राटी पद्धतीनेही कामगारांची नियुक्ती करू नये, असा आदेश प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनी काढला आहे. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील अभियंता संवर्गातील पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. ‘कमवा आणि चालवा’ या तत्त्वावरच सध्या प्राधिकरणाचा कारभार सुरू आहे. योजना राबविण्यासाठी आणि चालविण्यासाठी शासनाकडून कुठलेही अनुदान मिळत नाही. एवढेच काय, वेतनासाठीही निधी दिला जात नाही. गेल्या २० वर्षांत प्राधिकरणाची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळेच विविध कारणांमुळे रिक्त झालेली आणि नव्याने कुठलीही पदे भरण्यास अनिश्चित काळासाठी पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. १ मार्च २००० च्या आदेशानुसार अ, ब, क आणि ड या गटातील सर्व संवर्गाची पदे सरळसेवेने न भरण्याचा आदेश काढण्यात आला होता. प्राधिकरणाच्या जवळपास २५ योजनांवर एक हजार २०० कंत्राटी कामगार कार्यरत आहेत.सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आदी कारणांमुळे रिक्त झालेल्या जागा भरल्या गेल्या नाहीत. परिणामी प्राधिकरणात कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला. यावर उपाय म्हणून हंगामी, कंत्राटी कामगारांची नियुक्ती करून त्यांच्यावर विविध प्रकारची जबाबदारी सोपविण्यात आली. संगणक चालक, पंपिंग, मीटर रीडिंग, पाण्याचा वॉल सुरू-बंद करणे, शिपाई आदी कामांसाठी कंत्राटी कामगार घेण्यात आले. त्यांना प्राधिकरणामार्फतच मानधन दिले जात होते. केवळ चार ते पाच हजार रुपयांवर त्यांना किमान दहा ते बारा तास काम करावे लागत होते. प्राधिकरणाला मानधन देणेही झाले जड-प्राधिकरणाला या कर्मचाऱ्यांचे मानधन देणेही जड चालले आहे. कंत्राटी आणि हंगामी कामगारांना ठेवायचेच नाही, असा आदेशच काढण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नोकरभरती करू नये, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. -आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबीही त्यात देण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटी कामगार करीत असलेली कामे कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.