शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामांचे धोरण ठरणार

By admin | Updated: June 13, 2014 03:14 IST

राज्यातील अनेक शहरांमध्ये अनधिकृत बांधकामांचा विषय महत्त्वाचा असून, या बांधकामांबाबत संपूर्ण राज्यासाठी एकच शासकीय धोरण आखण्यात येईल

मुंबई : राज्यातील अनेक शहरांमध्ये अनधिकृत बांधकामांचा विषय महत्त्वाचा असून, या बांधकामांबाबत संपूर्ण राज्यासाठी एकच शासकीय धोरण आखण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केले. हे धोरण आखण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात पुणे जिल्ह्यातील विलास लांडे, बापुसाहेब पाठारे या सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. महापालिका प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार या संपूर्ण परिसरात १.१० लाख विनापरवाना बांधकामे आढळली. त्यांना महापालिकेने कलम ५३नुसार नोटिसा पाठविल्या असल्यानेत्यांच्यावर टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडची बांधकामे नियमित करावीत, असा ठराव तेथील महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. अनधिकृत बांधकामांबाबत शासनाने केवळ एका शहरासाठी भूमिका घेऊन चालणार नाही. त्यासाठी सर्वसमावेशक राज्यव्यापी धोरण आणावे लागेल. हे धोरण कसे असावे, याची शिफारस करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. समितीमध्ये एकूण १४ सदस्य असतील आणि त्यातील १२ हे विविध महापालिकांचे आयुक्त असतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, कायद्यानुसार जी बांधकामे नियमित करणे शक्य नाही ती पाडून टाका असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायलयाने २०११मध्येच दिले आहेत. त्यानुसार कारवाई करण्यासाठी खूप मोठी यंत्रणा लागणार असून, ती उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, हा विषय खूप व्यापक आहे. त्यात नैतिकतेचा पेच आहे. कारण मानवतेचा विचार करून अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या लोकांसाठी परवानगी द्यायची तर ती बांधकामे करणारे सुटतात आणि इमारती पाडायच्या म्हटले तर हजारो लोकांच्या निवासाचा प्रश्न उभा राहतो. समितीच्या अहवालानंतर जरूर तर कायदा बदलण्यासाठी सभागृहापुढे जावे लागेल. पण वेळेची मर्यादा घालता येणार नाही. (विशेष प्रतिनिधी)