शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्स्टेबल काळोखेची महिला तस्कर प्रेयसी?

By admin | Updated: March 12, 2015 05:17 IST

एमडीसाठ्यासह सातारा पोलिसांनी गजाआड केलेल्या धर्मराज काळोखे हा पोलीस शिपाई गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अंमली पदार्थांची तस्करी व विक्री

जयेश शिरसाट, मुंबईएमडीसाठ्यासह सातारा पोलिसांनी गजाआड केलेल्या धर्मराज काळोखे हा पोलीस शिपाई गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या महिलेच्या संपर्कात होता, अशी माहिती हाती आली आहे. या महिलेसोबत त्याचे विवाहबाह्य संबंध होते. याच संबंधांमधून तो अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतल्यांचे समजते.मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेल काळोखेकडून सातारा पोलिसांना एमडी या अत्यंत घातक अंमलीपदार्थाचा तब्बल ११० किलो साठा सापडला. त्याला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी पोलीस ठाण्यातील त्याच्या एका कपाटात काळोखेने दडवून ठेवलेले १२ किलो एमडी आणि ३३ हजारांची रोकड जप्त केले. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काळोखे अंमलीपदार्थांच्या तस्करीत अडकला तो बेबी पेडणेकर या महिलेमुळे. ५०वर्षांच्या बेबीचा वरळीच्या जीजामाता नगर झोपडपटटीत अंमलीपदार्थांचा अडडा होता. १५ वर्षांपुर्वी काळोखे वरळी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना त्याची तिच्याशी ओळख व त्याचे रूपांतर प्रेमप्रकरणात झाले. पोलिसांची धाड पडल्यानंतर ती परतावयाची याची माहिती तो तिला देत असे. गेल्यावर्षी ३० डिसेंबरला पोलिसांनी बेबीच्या वरळीतल्या घरातून एमडीचा साठा हस्तगत केला होता. या प्रकरणी बेबीची सून आणि तिचा बाप उपेंद्र माझगावकर यांना अटक करण्यात आली होती. तर बेबी फरार होती. दरम्यान, अंमलीपदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी काळोखेची कसून चौकशी केली.