शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पेयजल योजनेचा निधी खर्च करण्यात कंजुषी

By admin | Updated: June 1, 2014 00:56 IST

राज्यातीन तीन जिल्ह्यांनीच केला संपूर्ण निधीचा विनीयोग

अकोला : राज्याच्या ग्रामीण भागात पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी राबविल्या जाणार्‍या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजेनचा निधी मोठय़ा प्रमाणावर पडून आहे. राज्यातील वर्धा, गोंदिया व नांदेड या तीन जिल्ह्यांनीच या निधीचा पुरेपुर वापर केला. इतर जिल्हे मात्र अद्याप अर्धाही निधी खर्च करु शकलेले नाहीत. मार्च अखेर पर्यंत सरासरी ४७ टक्के निधी या योजनेतुन खर्च झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी अनेक ग्रामीण भागात पिण्याचा पाण्याच्या योजना कार्यान्वित होऊ शकलेल्या नाहीत. देशातील ग्रामीण भागातील जनतेला पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासनाने ह्यराष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनाह्ण सुरु केली. ही योजना मागणीवर आधारित आहे. ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या आहे अशी गावे आणि ज्या ग्रामपंचायती पाणीपट्टी वसूल करुन देखभाल व दुरुस्ती करण्यास सक्षम आहेत अशा गावांची निवड या योजनेसाठी केली जाते. राज्य शासनाच्या मार्फत निधीचे वाटप करुन ही योजना गावांमध्ये राबविण्यात येते. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसाठी केंद्र शासनाने राज्य शासनाला वर्ष २0१३-१४ करिता ७२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. सुरुवातीला ३ हजार ८३५ गावे या योजनेसाठी निवडण्यात आली होती. त्यात वाढ होऊन गावांची संख्या ४ हजार ५00 इतकी झाली. या योजनेचा मार्च अखेरीस आढावा घेतला असता या योजनेवर ४७.२३ टक्के खर्च झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक जिलंनी तर २५ टक्यांपेक्षा कमी निधी खर्च केला असल्याचे आढळून आले आहे. संपूर्ण निधी खर्च करण्यात विदर्भातील वर्धा आणि गोंदिया तर मराठवाड्यातील नांदेड या जिलंचा समावेश आहे. विदर्भात यवतमाळ, मराठवाड्यात बीड तर कोकणात रायगड या जिलंनी सर्वात कमी म्हणजेच ४५ टक्यांच्या खाली निधी खर्च केल्याचे आढळून आले आहे. निधी खर्च करण्यात वर्धा, गोंदिया आणि नांदेड यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शंभर टक्के निधी खर्च केला आहे. या खालोखाल भंडारा, कोल्हापूर व नाशिक हे जिल्हे निधी खर्च करण्यात आघाडीवर आहेत. सर्वात कमी म्हणजे २५ टक्कयापेक्षा कमी निधी खर्च करणारे वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार हे तीन जिल्हे आहेत. इतर जिलंची निधी खर्च करण्याची टक्केवारी २५ ते ७0 टक्कयां दरम्यान आहे