शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे मुस्लीम कार्ड

By admin | Updated: January 14, 2017 05:00 IST

शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आशियातील या श्रीमंत महापालिकेवर कब्जा मिळविण्यासाठी प्रत्येक

गौरीशंकर घाळे / मुंबईशिवसेना, भाजपा आणि काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आशियातील या श्रीमंत महापालिकेवर कब्जा मिळविण्यासाठी प्रत्येक पक्ष नवमतदारांसोबतच परंपरागत व्होट बँक जपण्याचा आटापिटा करीत आहे. ज्या प्रभागांमध्ये ५० टक्के आणि त्याहून अधिक मुस्लीम लोकवस्ती असेल तिथे मुस्लीम उमेदवार देण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात मुस्लीम समाजात असणाऱ्या नाराजीचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी काँग्रेसकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील २२७ प्रभागांपैकी जवळपास ४० ते ५० ठिकाणी मुस्लीम समाजाची वस्ती आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तापरिवर्तनानंतर मुस्लीम समाजामध्ये नाराजीचे वातावरण आहे. गोवंश हत्याबंदी, काही भाजपा नेत्यांची वादग्रस्त विधाने यामुळे मुस्लीम समाजात भाजपाविरोधी वातावरण तयार झाले आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मुस्लीम वस्त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आणि त्रास दिल्याचा प्रचार सोशल मीडियातून करण्यात आला. एमआयएमचे नेते असुद्दिन ओवेसी यांनी तसा थेट आरोपही केला. या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजातील ही भाजपाविरोधी भावना मतपेटीद्वारे काँग्रेसच्या बाजूने व्यक्त व्हावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. एकेकाळी मुस्लीम मते काँगे्रसची हक्काची व्होट बँक मानली जात. आता त्यात समाजवादी पार्टी आणि एमआयएम आदी वाटेकरी तयार झाले आहेत. गेल्या काही निवडणुकांमध्ये ही व्होट बँक फुटल्याने काँग्रेसला त्याची किंमत मोजावी लागली होती. पालिका निवडणुकीत मात्र ही व्होट बँक एकसंध राहावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. शिवसेना आणि भाजपाला केवळ काँग्रेसच पर्याय आहे. समाजवादी पार्टी आणि एमआयएममुळे मुस्लीम मतांमध्ये पडणारी फूट शिवसेना-भाजपाच्या पथ्थ्यावर पडत आहे. मुस्लीम मतांमध्ये फूट पडावी यासाठीच एमआयएमला जाणीवपूर्वक हवा दिली जात असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. मुस्लीम मतांमध्ये फूट आणि शिवसेना-भाजपाचा फायदा, हे समीकरण मुस्लीम समाजामध्ये ठसविण्यासाठी काँग्रेसकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.