जुलैमध्ये काँग्रेसचे महाअधिवेशन?

By Admin | Updated: June 3, 2014 00:46 IST2014-06-03T00:46:31+5:302014-06-03T00:46:31+5:30

ताज्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पाश्र्वभूमीवर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरील विश्वास बहालीसाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत़

Congress's grand convention in July? | जुलैमध्ये काँग्रेसचे महाअधिवेशन?

जुलैमध्ये काँग्रेसचे महाअधिवेशन?

>नबीन सिन्हा  - नवी दिल्ली
ताज्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पाश्र्वभूमीवर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरील विश्वास बहालीसाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत़ याच प्रयत्नांतर्गत जुलैप्रारंभी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाअधिवेशन घेण्याची पक्षाची योजना आह़े
राहुल गांधी यांनी विविध राज्यांचे नेते आणि अन्य पदाधिका:यांसोबत बैठकींचे सत्र चालवले आह़े सोमवारी त्यांनी झारखंड, ओरिसा आणि छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली़ पक्षापुढील आव्हानांसंदर्भात आपले सल्ले व सूचना देण्याची विनंतीही त्यांनी पक्षनेते व कार्यकत्र्याना केली़
‘लोकमत’शी बोलताना काँग्रेस सरचिटणीस बी़ क़े हरिप्रसाद यांनी  सांगितले की, राज्यांतील नेत्यांसोबतच्या बैठका ही निरंतर प्रक्रिया आह़े महिनाअखेर्पयत राहुल गांधी यांच्या सर्व राज्यांच्या नेत्यांसोबत नियोजित बैठकी अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितल़े 

Web Title: Congress's grand convention in July?