शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

‘दाभडी’त काँग्रेसची आज ‘चाय की चर्चा’

By admin | Updated: March 20, 2015 01:41 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे २० मार्च २०१४ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विविध आश्वासने दिली होती.

नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे २० मार्च २०१४ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विविध आश्वासने दिली होती. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने मोदी यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी दाभडी येथे शुक्रवार, २० मार्च रोजी काँग्रेसने शेतकऱ्यांसोबत ‘चाय की चर्चा’ आयोजित केली आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी गुरुवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मोदी यांनी दाभडी येथील ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमात शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. त्यात उत्पादन खर्चात ५० टक्के नफा समाविष्ट करून शेतमालाचे भाव ठरविणे, अत्यल्प दरात कर्जपुरवठा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष प्रयत्न, कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग आदींचा त्यात समावेश होता. शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवून भाजपाला भरभरून मते दिली. मात्र सत्तेत आल्यावर केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने आश्वासनपूर्तीबाबत कुठलेही पाऊल उचलले नाही, हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे.पुढील चार वर्षांत तरी सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे म्हणून मोदी यांनी निवडलेल्या दाभडी येथे आर्णी विधानसभा युवक काँग्रेसतर्फे दु. ३ वा. शेतकऱ्यांसोबत ‘चाय की चर्चा’ होणार आहे. या कार्यक्रमाला शिवाजीराव मोघे यांच्यासह खासदार राजीव सातव, काँग्रेस नेते बाला बच्चन आणि तेलंगणचे काँग्रेस नेते रामचंद्र रेड्डी यांच्यासह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातीलही शेतकरी उपस्थित राहणार आहेत, असे मोघे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)