शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar : 'आघाडीमध्ये संधी मिळाल्यास आमच्याकडे जयंत पाटलांसारखा अनुभवी चेहरा'; रोहित पवारांचं सूचक विधान
2
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
3
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
4
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
5
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
6
स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार
7
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
8
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
9
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
10
“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा
11
बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
12
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
13
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
14
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
15
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
16
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
17
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
18
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
19
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
20
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 

काँग्रेसचा एल्गार : ३१ ऑगस्टपासून कोल्हापुरातून जनसंघर्ष यात्रेला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 4:25 PM

येत्या ३१ ऑगस्टपासून कोल्हापुरातून जनसंघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पुण्यात दिली. 

पुणे :सरकारच्या धोरणांमधून निर्माण झालेली स्थिती बदलण्यासाठी काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या ३१ ऑगस्टपासून कोल्हापुरातून जनसंघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पुण्यात दिली. 

         पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, चारुलता टोकस उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. 

          ते म्हणाले की, भाजपने आत्तापर्यंत फक्त घोषणा केल्या असून फक्त मोजक्या ऊद्योगपतींचा विकास केला आहे. त्यांनी लोकशाही धोक्यात आणली असून विविध माध्यमातून काँग्रेस त्याचा निषेध करत आहे. आमची ही भूमिका लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ३१ तारखेला सुरु होणारी ही यात्रा ७ आणि ८ सप्टेंबरला पुण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.यावेळी त्यांनी देशातील सामाजिक वातावरण गढूळ झाल्याचे म्हटले.डॉ दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, गौरी लँकेशा यांच्या हत्येनंतर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.  

अशोक चव्हाण म्हणाले की, 

  • सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. 
  • देशात महिलांवर अत्याचार सुरु आहेत. 
  • माध्यमांची गळचेपी सुरु आहे. 
  • १५ हजार अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 
  • रोजगाराची स्थिती गंभीर असून बेरोजगारी कायम आहे. दीड कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. 
  • देशातील चार न्यायाधीशांनी लोकशाही धोक्यात आल्याचे जाहीर केले.

       

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणkolhapurकोल्हापूर