शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस एकटी नाही, आम्हाला घेऊन बुडाली - प्रफुल्ल पटेल

By admin | Updated: September 12, 2016 20:41 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलाही भ्रष्टाचार किंवा घोटाळा केलेला नाही. मात्र आमच्यावर घोटाळयाचे आरोप आणि आमच्यामागे तपासाचे शुक्लकाष्ठ काँग्रेस नेत्यांनी लावले.

 ऑनलाइन लोकमत 

अकोला, दि. १२ - राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलाही भ्रष्टाचार किंवा घोटाळा केलेला नाही. मात्र आमच्यावर घोटाळयाचे आरोप आणि आमच्यामागे तपासाचे शुक्लकाष्ठ काँग्रेस नेत्यांनी लावले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला. ते अकोला येथे बोलत होते. 
 
आमचे सरकार राज्यात सत्तेवर असताना काँग्रेसला शिवसेना-भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस जास्त डाचत होता. पृथ्वीराज चव्हाणांसारख्या काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीला त्रास देण्यासाठी तपासाचे शुक्लकाष्ठ मागे लावले असा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला. 
 
अल्पसंख्यांक, दलित काँग्रेसबरोबर असतात. काँग्रेसच जुना पक्ष आहे असे म्हणतात पण आता तशी स्थिती राहिलेली नाही. काँग्रेसचे कुठे वर्चस्व आहे अशी स्थिती राहिलेली नाही असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी हे आरोप केले. 
 
काँग्रेस पक्ष स्वत: तर बुडाला पण आम्हाला सोबत घेऊन बुडाला.  राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उसळी घेऊन उभी राहिल असा आशावाद पटेलांनी व्यक्त केला.