शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

'शिवसेनेला घातली ईडीची भीती, त्यामुळेच झाली भाजपासोबत युती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 19:42 IST

शिवसेना-भाजपावर काँग्रेस, राष्ट्रवादीची जोरदार टीका

मुंबई: शिवसेना-भाजपाची युती जवळपास निश्चित झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपानं एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र याबद्दलची अधिकृत घोषणा होण्याआधीच काँग्रेस, राष्ट्रवादीनं युतीवर तोफ डागली. अंमलबजावणी संचलनालयाच्या भीती भाजपाकडून दाखवण्यात आल्यानं शिवसेनेनं युती केल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपावर कायम टीकेचे बाण सोडणारी शिवसेना युतीसाठी कशी काय तयार झाली, याचं उत्तर त्यांनी राज्यातल्या जनतेला द्यायला हवं, असं विखे पाटील यांनी म्हटलं. 'माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार, भाजपाकडून शिवसेनेला ईडीची भीती दाखवण्यात आली. त्यानंतर त्यांनी लगेच युतीची तयारी दर्शवली,' असा दावा त्यांनी केला. काँग्रेससोबतच राष्ट्रवादीनंही युतीवर निशाणा साधला. 'चौकीदार ही चोर अशी टीका शिवसेना पंतप्रधानांवर करत होती. मघ आता हे चोरावर मोर आहेत का,' असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केला.शिवसेना-भाजपाच्या युतीची घोषणा थोड्याच वेळात होण्याची शक्यता आहे. या चर्चेसाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर मुंबईत आले आहेत. या नेत्यांसह शहांनी सोफिटेल हॉटेलमध्ये चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. त्यानंतर ही नेते मंडळी युतीच्या चर्चेसाठी मातोश्रीवर पोहोचली. याआधी उद्धव यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला संजय राऊत, चंद्रकांत खैरे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. युती झाल्यानंतर नेमकी रणनिती काय असणार, जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जाणार, याबद्दल या दोन्ही बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं. गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेनेनं सातत्यानं मोदी सरकारवर टीका केली आहे. याशिवाय स्वबळाचा नारादेखील उद्धव यांनी दिला होता, त्यामुळे आता शिवसेना मतदारांना कशी सामोरी जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmit Shahअमित शहाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९