congress nana patole slams devendra fadnavis and modi govt over corona situation | “पंतप्रधान मोदी प्रचारात मस्त आणि देशातील जनता कोरोनाने त्रस्त”

“पंतप्रधान मोदी प्रचारात मस्त आणि देशातील जनता कोरोनाने त्रस्त”

ठळक मुद्देविरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर पंतप्रधान मोदी काय करतायत - काँग्रेसची विचारणादेवेंद्र फडणवीसांचे केंद्रात वजन नाही - पटोले

मुंबई: महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची स्थिती भयंकर होताना दिसत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला लॉकडाऊन म्हणणार नाही, असे सांगत कठोर निर्बंध लागू केले. १४ एप्रिल ते १ मे या पंधरा दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आले असून, यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. विरोधकांच्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी जोरदार उत्तर दिले असून, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे. (nana patole slams devendra fadnavis and modi govt over corona situation)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्बंध लावल्यानंतर, सरकारने जाहीर केलेले पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या टीकेला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी परखड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांचे केंद्रात वजन नाही, हे मला माहिती आहे. कारण त्यांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण त्यांचे जर वजन असेल, तर त्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याचे केंद्रात अडकलेले ९० हजार कोटी रुपये मिळवून द्यावेत आणि या मुद्द्यावर राजकारण करू नये, असा टोला पटोले यांनी लगावला.

भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं

पंतप्रधान मोदी काय करतायत

देशात सगळ्याच राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत चालला असताना पंतप्रधान मोदी काय करत आहेत, अशी विचारणा करत त्यांना केवळ निवडणुका दिसत आहेत. विनामास्क प्रचार करून ते कोणता संदेश देतात, पंतप्रधान प्रचारात मस्त आहेत आणि जनता करोनाने त्रस्त आहे. लोकांचा जीव जातोय. अनेक परिवारांमध्ये करोनामुळे कर्ते लोकं मरण पावले आहेत. कुणीही राजकारण करू नये, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला आहे. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस

सरकारने जाहीर केलेली ३ हजार ३०० कोटींची तरतूद ही अर्थसंकल्पातील नियमित तरतूद आहे. त्यामुळे ही कोरोनासाठीची तरतूद नाहीच. त्यामुळे सरकारचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. मुंबई-पुणे याव्यतिरिक्तही महाराष्ट्र आहे. नागपूर, नाशिक, औरंगाबाद येथे आरोग्य व्यवस्था वाढवण्यासंदर्भात सरकारकडून कोणतीच कृती होताना दिसत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्यात काय सुरू आणि काय बंद? पाहा, एका क्लिकवर

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: congress nana patole slams devendra fadnavis and modi govt over corona situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.