"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:38 IST2025-06-23T13:35:55+5:302025-06-23T13:38:23+5:30
Foreign Policy: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी परराष्ट्र धोरणावरून सरकारवर टीका केली.

"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेत युद्धाचे ढग दाटले असतानाच अमेरिकेने या युद्धात उडी घेतली. अमेरिकेने शक्तिशाली बॉम्ब टाकून इराणने जमिनीच्या खाली उभारलेल्या लष्करी सुविधा आणि आण्विक तळ उद्ध्वस्त केले. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे आमदार आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त केली. तसेच परराष्ट्र धोरणावरून सरकारवर टीका केली.
#WATCH | Nagpur: Maharashtra Assembly CLP and Congress leader Vijay Wadettiwar says, "What is your Foreign Policy? Clear it before the people once...A WWIII can break out. So, our stand should be clear. That is what Sonia ji has said. When Israel attacks Iran, we should speak up… pic.twitter.com/AxgZCsfgRv
— ANI (@ANI) June 23, 2025
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "तुमचे परराष्ट्र धोरण काय आहे? ते एकदा लोकांसमोर स्पष्ट करा. तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी देखील हेच म्हटले आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आपण कोणासोबत आहोत, हे स्पष्ट केले पाहिजे. आपली परिस्थिती 'शोले' चित्रपटासारखी आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पण जेव्हा आपण पाठी वळून बघतो, तेव्हा तुमच्या मागे कोणीही नसते.देशाला अशा टप्प्यावर आणू नका. आमचे नेतेही हेच बोलत आहेत."
इराण आणि इस्त्रायल युद्धात अमेरिकेने उडी घेतली. इराणचा आण्विक कार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकेनेही रविवारी पहाटेच्या सुमारास इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्बनी हल्ला केला. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'व्हाइट हाऊस'वरून राष्ट्राला संबोधित करताना इराणच्या आण्विक केंद्रांवर हल्ला करून ती पूर्णपणे नष्ट करण्यात आली असल्याचे सांगितले. त्यामुळे तिसर्या महायुद्धाची भिती व्यक्त केली जात आहे. या युद्धात जगातील इतर देशसुद्धा ओढले जाण्याची शक्यता आहे.