शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे मोदी सरकार लुटारू; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 2:14 PM

पेट्रोल आणि डिझेलवर अवाजवी करवाढ करून दिवसाढवळ्या जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजपचे सरकार लुटारू आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेस मंत्री व आमदारांनी सायकलवरून प्रवास करत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनात पोहोचले.

ठळक मुद्देइंधनदरवाढीवरून नाना पटोले यांचा केंद्रावर हल्लाबोलइंधनावर भरमसाठ करवाढ - नाना पटोलेंचा दावाकेंद्राने लोकांच्या जखमेवर मीठ चोळले - नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर अवाजवी करवाढ करून दिवसाढवळ्या जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजपचे सरकार लुटारू आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेस मंत्री व आमदारांनी सायकलवरून प्रवास करत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनात पोहोचले. (congress leader nana patole slams modi govt over fuel price hike)

पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर नाना पटोले प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

सर्व आरोपांवर उत्तरं देण्यास बांधील नाही; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल  

इंधनावर भरमसाठ करवाढ 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करून लूट करत आहे. त्यात आणखी १८ रुपये रस्ते विकास सेसच्या माध्यमातून तर ४ रुपये कृषी सेसच्या माध्यमातून घेतले जात आहेत. करांशिवाय पेट्रोलची किंमत ३२ रुपये ७२ पैसे प्रति लीटर आणि डिझेलची किंमत ३३ रुपये ४६ पैसे प्रति लीटर आहे. परंतु, मोदी सरकारने इंधनावर एक्साईज ड्यूटी लावून पेट्रोलचे दर १०० रुपये आणि डिझेलचे दर ९० रुपये लीटरपर्यंत वाढवले, असे नाना पटोले यांनी सांगितले.

लोकांच्या जखमेवर मीठ चोळले

एलपीजी गॅस सिलींडरच्या आज पुन्हा दरात २५ रुपयांची वाढ केली आहे. जनतेमध्ये या महागाईविरोधात प्रचंड असंतोष असून, मोदी सरकारने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. जनता महागाईने होरपळून गेली असताना थंडीमुळे दरवाढ झाल्याचा जावाई शोध लावून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी लोकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. 

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण