शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Maratha Reservation: मराठा आरक्षणबाबत राजकारण नव्हे, सहकार्य करा; अशोक चव्हाण यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 17:35 IST

भारतीय जनता पक्षाने (BJP) केलेल्या तथ्यहिन दाव्याचा मराठा आरक्षण (Maratha Reservation) विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पर्दाफाश केला.

ठळक मुद्दे'खोटे बोल पण रेटून बोल' हीच भाजप नेत्यांची मानसिकता - अशोक चव्हाणमराठा आरक्षणाबाबत भाजपची राज्यात आणि केंद्रात वेगळी भूमिका - अशोक चव्हाणमराठा आरक्षणासाठी सहकार्य करण्याचे अशोक चव्हाण यांचे आवाहन

मुंबई : एसईबीसी कायदा हा नवीन कायदा नसून, तो २०१४ चा जुना ईएसबीसी कायदा आहे. २०१८ मध्ये त्यात केवळ सुधारणा झाली. या भारतीय जनता पक्षाने (BJP) केलेल्या तथ्यहिन दाव्याचा मराठा आरक्षण (Maratha Reservation) विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पर्दाफाश केला. तसेच मराठा आरक्षणाबाबत राजकारण नव्हे, तर सहकार्य करण्याचे आवाहनही अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना केले. (congress leader ashok chavan appeal bjp to support over maratha reservation)

मराठा आरक्षण कायदा हा १०२ व्या घटना दुरूस्ती पूर्वीचा जुनाच कायदा असल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र, वस्तुस्थिती दाव्याच्या विपरीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सप्रमाण स्पष्ट केले. विधानभवन परिसरात पत्रकारांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, २०१८ चा एसईबीसी कायदा हा पूर्णतः नवीन कायदा आहे. मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण लागू करणाऱ्या २०१८ च्या एसईबीसी कायद्याच्या कलम १८ मध्येच हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर २०१४ चा ईएसबीसी कायदा रद्दबातल होईल, असे नमूद करण्यात आले. यासंदर्भात भाजप नेत्यांनी केलेली विधाने धादांत चुकीची, दिशाभूल करणारी आणि 'खोटे बोल पण रेटून बोल' ही मानसिकता अधोरेखीत करणारी आहेत, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

मराठा आरक्षण टिकविता येत नसेल, तर किमान दिशाभूल करू नका: प्रवीण दरेकर

'खोटे बोल पण रेटून बोल' हीच भाजप नेत्यांची मानसिकता

मराठा आरक्षणाची ऑनलाइन सुनावणी ऐकणाऱ्या असंख्य लोकांनी केंद्र सरकारचा तोंडी युक्तिवाद ऐकला. केंद्र सरकारने मांडलेली बाजू सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात नोंदली गेली आहे. त्याविषयी मी कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही, त्याचा अन्वयार्थ लावलेला नाही किंवा हेतुआरोप केलेले नाहीत. केवळ वस्तुस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणासाठी सहकार्य करावे

मराठा आरक्षणाबाबत भाजपची राज्यात आणि केंद्रात वेगळी भूमिका आहे. एवढेच नव्हे तर, प्रसारमाध्यमांसमोर तिसरंच काहीतरी ते बोलतात. मराठा आरक्षणासारख्या सामाजिक विषयावर राजकारण करण्याऐवजी त्यांनी केंद्र सरकारला सांगून सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडली पाहिजे. हा कायदा कोण्या एका राजकीय पक्षाने केलेला कायदा नसून, विधीमंडळातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन एकमताने पारित केलेला कायदा आहे. हा कायदा टिकला पाहिजे, हाच राज्य सरकारचा प्रयत्न असून, त्याला भाजपच्या केंद्र सरकारकडून सहकार्य अपेक्षित असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभाAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा