Varsha Gaikwad: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 04:31 PM2021-09-17T16:31:39+5:302021-09-17T16:32:41+5:30

Varsha Gaikwad: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Congress has given a big responsibility to Varsha Gaikwad for the Uttar Pradesh Assembly elections | Varsha Gaikwad: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी 

Varsha Gaikwad: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी 

Next

नवी दिल्ली - पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. एकेकाळी उत्तर प्रदेशच्या राजकारणात वर्चस्व राखणारा काँग्रेस पक्ष सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाने या निवडणुकीत छाप पाडण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. (Congress has given a big responsibility to Varsha Gaikwad for the Uttar Pradesh Assembly elections)

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नियुक्त केली आहे. या समितीमध्ये दीपेंद्र सिंह हुड्डा आणि वर्षा गायकवाड यांची सदस्य म्हणून नियुक्ती  करण्यात आली आहे. तसेच या समितीमध्ये प्रियंका गांधी, अजय कुमार लल्लू, आराधना मिश्रा मोना, आणि उत्तर प्रदेशमधील सर्व सचिव, प्रभारींचा समावेश करण्यात आला आहे. के.सी. वेणुगोपाल यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली आहे.

काँग्रेस उत्तर प्रदेशमधील सत्तेपासून गेल्या ३० वर्षांपासून दूर आहे. २०१७ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या अमेठी आणि रायबरेलीच्या लोकसभा मतदारसंघातील काही विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे या निवडणुकीच समधानकारक कामगिरी करण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. 

Read in English

Web Title: Congress has given a big responsibility to Varsha Gaikwad for the Uttar Pradesh Assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app