वाढदिवशीच माजी आमदाराचे निधन; काँग्रेस नेते मधुकर ठाकूर कालवश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 11:02 IST2021-07-15T10:57:43+5:302021-07-15T11:02:26+5:30
Madhukar Thakur passed away on his birthday:मधुकर ठाकूर मागील 3 ते 4 वर्षांपासून आजारी होते.

वाढदिवशीच माजी आमदाराचे निधन; काँग्रेस नेते मधुकर ठाकूर कालवश
रायगड: वाढदिवशीच काँग्रेसचे खंदे समर्थक आणि अलिबाग-उरण मतदारसंघाचे(Alibag Uran constituency) माजी आमदार मधुकर ठाकूर (Madhukar Thakur) यांचे निधन झाले आहे. मागील 3 ते 4 वर्षांपासून ते आजारी होते. पहाटे पाच वाजेच्या सुमारास 74 वर्षीय मधुकर ठाकूर यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, आज(15जुलै) रोजी त्यांचा वाढदिवस होता. आज दुपारी दोन वाजता अलिबाग(Alibag) तालुक्यातील सातीर्जे या गावात मधुकर ठाकरू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मधुकर ठाकूर यांचा राजकीय प्रवास
मधुकर ठाकूर यांनी झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. तिथून त्यांनी जिल्हा परिषद आणि मग 2004 ते 2009 या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे ते आमदार झाले. मधुकर ठाकुर यांनी 2004 मध्ये शेकापच्या तत्कालीन राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचा पराभव केला होता. अलिबागमध्ये तब्बल 32 वर्षांनी शेकापचा पराभव झाला होता.
काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या मधुकर ठाकूर यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपदही भूषवले. याशिवाय त्यांना प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही काँग्रेसने गौरवले होते. राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांच्य़ासोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.