शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

‘काँग्रेस भवन’ला कार्यकर्त्यांकडून टाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 4:34 AM

‘स्वाभिमानी’ला जागा सोडल्याने संताप

सांगली : लोकसभेची सांगलीची जागा काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या जागावाटपात स्वाभिमानी शेतकरी संघटनेस सोडण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने सांगलीत काँग्रेसचे कार्यकर्ते शुक्रवारी आक्रमक झाले. त्यांनी सांगलीतील काँग्रेस भवनच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकल्यामुळे नेत्यांची पंचाईत झाली. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीतून वसंतदादा आणि कदम घराण्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचेही स्पष्ट झाले. अखेर ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेत कुलूप काढून वादावर पडदा टाकला.सांगलीत शुक्रवारी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. दुपारी दीड वाजता घोषणाबाजी करीत काँग्रेस भवनलाच टाळे ठोकले. काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील तातडीने तेथे आले. त्यांनी सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील, यासाठी प्रयत्न करूया, अशी समजूत काढली. यामुळे कार्यकर्ते शांत झाले. काही वेळानंतर शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस भवनचे कुलूप तातडीने काढले. कुलूप घालण्यावरून वसंतदादा गट आणि कदम गटातील मतभेद उघड झाले. घोषणाबाजीवरुनही दोन्ही गटात धुसफूस होती. दोन्ही गटात बराच वेळ खडाजंगी झाली.दादा घराण्याने पळ का काढला? - कदमसांगली राजू शेट्टींना देऊ नये, अशीच भूमिका मी पक्षाकडे मांडली आहे. परंतु, आता काँग्रेस भवनला टाळे ठोकून तमाशा करणाऱ्या दादा घराण्याने सांगली मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले? मंत्रीपद आणि ३५ वर्षांच्या खासदारकीनंतरही लोकसभेच्या मैदानातून दादा घराण्याने पळ का काढला, असा सवाल काँग्रेसचे आ. विश्वजित कदम यांनी केला.झारीतील शुक्राचार्य कोण?- विशाल पाटीलस्वाभिमानीला जागा सोडण्याची ‘सेटलमेंट’ केली तो झारीतील शुक्राचार्य कोण, हे सर्वांना माहीत आहे. वसंतदादा घराण्याला संपविण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेस नेते व वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिला. ही जागा सोडून भाजपाशी सेटलमेंट होत आहे का, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस