शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एपस्टिन फाईल प्रकरणी सोमवारी काँग्रेस आणि वंचित संघाच्या मुख्यालयावर काढणार मोर्चा, सपकाळ आणि प्रकाश आंबेडकर करणार नेतृत्व  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 15:46 IST

Nagpur News: एपस्टिन फाईलमध्ये आलेला नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख व अमेरिकेशी तडजोड करणारे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर कायम का ठेवले? याचा जाब विचारण्यासाठी सोमवार दिनांक २३ मार्च रोजी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षांचा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.

मुंबई -  एपस्टिन फाईलमध्ये आलेला नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख व अमेरिकेशी तडजोड करणारे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर कायम का ठेवले? याचा जाब विचारण्यासाठी सोमवार दिनांक २३ मार्च रोजी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षांचा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. नागपुरातील संविधान चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हजारो पदाधिकारी या मोर्चात सहभागी होणार आहेत.

अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टिन फाईलची जी माहिती जाहीर केली आहे, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री हरदीप पुरी यांचेही अनेकवेळा एपस्टिन फाईलमध्ये नाव आलेले आहे. अमेरिकेशी केलेल्या व्यापारी करारानेही भारतातील शेतकरी व शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. भारताने अमेरिकेशी तडजोड केली असून नरेंद्र मोदी यांनी भारताचे सार्वभौमत्व व स्वाभिमान गहाण ठेवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

एपस्टिन फाईलच्या निमित्ताने नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे चाल, चलन, चेहरा व चारित्र्य उघड झाले आहे. रा. स्व. संघ ही भाजपाची मातृसंस्था असून भाजपासाठी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय भाग घेत असते. भारताची जगात नाच्चकी होत असताना रा. स्व. संघाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधापदावर अद्याप का ठेवले आहे, या मागणीसाठी हा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress and VBA to protest Modi's name in Epstein file.

Web Summary : Congress and VBA will march to RSS headquarters demanding answers about PM Modi's alleged Epstein file link and US compromises. Sapkal and Ambedkar lead the protest against Modi's governance and alleged surrender of sovereignty.
टॅग्स :congressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयnagpurनागपूर