शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेला राज्यस्थान, मध्यप्रदेशच्या पुनरावृत्तीचं आघाडीचं लक्ष्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 17:06 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाची सुत्रे पुन्हा एकदा हाती घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत वेगाने समन्वय होण्यास मदतच होणार आहे. तर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार देखील या निवडणुकीत आपला अनुभव पणाला लावण्याची शक्यता आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या झोळीत भरभरून मते टाकली. त्यामुळे भाजपने सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा पार केला. तर भाजप प्रणीत एनडीएने साडेतीनशेचा आकडा गाठला. लोकसभा निवडणुकीत हे यश पाहता, तीन महिन्यांनी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती होईल, असा अंदाज सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह राजकीय विश्लेषकांना आहे. परंतु, मतदार केंद्रात एक आणि राज्यात दुसरं सरकार निवडत असल्याचे मागील निवडणुकांवरून समोर आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ही एक सकारात्मक बाब आहे. तर भाजप-शिवसेनेची चिंता वाढविणारी आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या तीनही राज्यात भाजपचे सरकार होते. मात्र या तीनही राज्यांत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सत्ता स्थापन केली. केंद्रात जरी नरेंद्र मोदींना निवडून दिले तरी राज्यात वेगळा पर्याय निवडू असा सूचक इशारा मतदारांनी भाजपला दिला आहे. त्यामुळे तीन महिन्यांनी राज्यात होणारी विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेसाठी वाटते तितकी सोपी नक्कीच नाही.

सध्या राज्यातील वातावरण भाजप-शिवसेनेसाठी अनुकूल दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक विधानसभा मतदार संघात सत्ताधारी भाजपला आघाडी मिळाली आहे. ही बाब सुखावणारी आहे. राज्यात आपण भाजप-शिवसेना युतीला रोखू हे आघाडीला शक्य वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाची सुत्रे पुन्हा एकदा हाती घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत वेगाने समन्वय होण्यास मदतच होणार आहे. तर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार देखील या निवडणुकीत आपला अनुभव पणाला लावण्याची शक्यता आहे. तसं नियोजन देखील आघाडीत सुरू असल्याचे समजते.

विधानसभेत एका पक्षाला पूर्ण बहुमत देणारे मतदार लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला निवडतात याचा अनुभव काँग्रेसला आला आहे. तर भाजपलाही हा अनुभव आहे. एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला राज्यातील नेतेमंडळीकडून एकदिलाने काम करून घ्यावे लागणार आहे. तसेच घटक पक्षांना सोबत घेण्यासाठी उभय पक्षांना थोडी मवाळ भूमिका घ्यावी लागणार आहे. या उपाययोजना करून महाराष्ट्रातही विधानसभेला मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडची पुनरावृत्ती करण्याचा आघाडीचा मानस आहे.