शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

‘अवकाळी’वरील गोंधळ अर्धा तासच टिकला

By admin | Updated: March 11, 2015 01:51 IST

राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची चर्चा बाकीचे कामकाज बाजूला सारून आधी घ्या, अशी मागणी करीत काँग्रेस

मुंबई : राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची चर्चा बाकीचे कामकाज बाजूला सारून आधी घ्या, अशी मागणी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मंगळवारी विधानसभेत आक्रमक झाले खरे पण या मुद्यावरून त्यांचा गोंधळ केवळ अर्धा तास टिकला. विरोधकांनी सभात्याग केला. सरकारने आपल्या इच्छेनुसार कामकाज पूर्ण केले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधी अवकाळी पावसाच्या नुकसानीची चर्चा करा, अशी मागणी केली. विरोधीपक्षनेते विखे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी चर्चेची मागणी कायम ठेवली. विरोधी सदस्यांनी सरकार आणि अध्यक्षांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्षांचा धिक्कार करणे हा सभागृहाचा अवमान असल्याचे सांगून, ‘माफी मागा नाही तर यांना निलंबित करा’, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हणताच गोंधळ अधिक वाढला. विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे, असे सांगत शिवसेनेचे गुलाबराव पाटील सरकारच्या बचावासाठी धावले. या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले. ते पुन्हा सुरू झाल्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला. विरोधक बाहेर पडल्यानंतर कामकाज सुरूच राहिले. अशाप्रकारे बाकीचे कामकाज थांबवून अवकाळीवर चर्चा घडवून आणण्यात विरोधकांना यश आले नाही. शेवटी सत्तापक्षाने या विषयावर नियम २९३ नुसार आणलेल्या प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली. (विशेष प्रतिनिधी)