शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘तुरुंगांतील गर्दीबाबत चिंता’

By admin | Updated: September 14, 2016 06:24 IST

राज्यातील तुरुंगांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी व अंडरट्रायल्स कोंबण्यात येत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, उच्च न्यायालयाने गृहविभागाच्या सहसचिवांना २१ सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

मुंबई : राज्यातील तुरुंगांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी व अंडरट्रायल्स कोंबण्यात येत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, उच्च न्यायालयाने गृहविभागाच्या सहसचिवांना २१ सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले.‘गृहविभागाचे सहसचिव व या प्रकरणाशी संबंधित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढील सुनावणीवेळी म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहावे,’ असा आदेश न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने दिला. कारागृहातील समस्यांसंदर्भात शेख अब्दुल नईम याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने वरील आदेश दिला. कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी व अंडरट्रायल्स ठेवू नयेत, तसेच अंडरट्रायल्सना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस अधिकारी व हवालदार उपलब्ध करावेत, अशी मागणी नईमने याचिकेद्वारे केली आहे.पोलिसांनी किती केसेसमध्ये नोटीस किंवा समन्स बजावले नाहीत आणि या कारणास्तव किती खटले प्रलंबित राहिले आहेत, याची तपशिलावार माहिती उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २१ सप्टेंबर रोजी द्यावी, असे निर्देश देण्यात आले. खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या वतीने बाजू लढणारे अ‍ॅड. एस. आर. नारगोळकर यांना संबंधित दिवाणी व सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांकडून या संदर्भातील माहिती वैयक्तिकपणे घेण्यास सांगितले.