उमा पानसरे यांचा जबाब नोंदवून पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2015 02:50 IST2015-05-16T02:50:47+5:302015-05-16T02:50:47+5:30

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांचा जबाब नोंदवून पूर्ण झाला. हा जबाब गोपनीय ठेवण्यात आला आहे.

Completed by recording the replies of Uma Pansare | उमा पानसरे यांचा जबाब नोंदवून पूर्ण

उमा पानसरे यांचा जबाब नोंदवून पूर्ण

कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांचा जबाब नोंदवून पूर्ण झाला. हा जबाब गोपनीय ठेवण्यात आला आहे. शनिवारी पानसरे यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण होत आहे.
कोल्हापुरात १६ फेबु्रवारी २०१५ ला सागरमाळ परिसरात गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. पानसरे यांचा मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना २० फेब्रुवारीला मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांसह दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) तपास केला आहे. पानसरे यांच्या हत्येचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल करत होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी उमा पानसरे यांचा जबाब घेतला. तीन टप्प्यांत त्यांना आठवेल अशा पद्धतीने जबाब घेण्यात आला परंतु त्याबद्दल पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे. अंकित गोयल यांनी पानसरे यांच्या जबाबाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना दिली.
उमाताई यांची प्रकृती आता सुधारली असली तरी त्यांच्या शरीराच्या एका बाजूला मार बसला आहे. त्यात फारशी सुधारणा नाही. त्यांची स्मृती सुधारली असली तरी हल्ला झाला त्यादिवशी नेमके काय घडले याबद्दल मात्र त्यांना आजही काहीच आठवत नाही. अगदीच त्रोटक माहिती त्या देत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Completed by recording the replies of Uma Pansare