सीमांध्रला दिलेले वचन पूर्ण करा

By Admin | Updated: June 3, 2014 23:03 IST2014-06-03T23:03:17+5:302014-06-03T23:03:17+5:30

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकारने सीमांध्रला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याची विनंती केली आहे.

Complete the promise to the threshold | सीमांध्रला दिलेले वचन पूर्ण करा

सीमांध्रला दिलेले वचन पूर्ण करा

>नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकारने सीमांध्रला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याची विनंती केली आहे. यात प्रामुख्याने या क्षेत्रला विशेष श्रेणीचा दर्जा देणो आणि पोलावरम सिंचन योजना कार्यान्वित करणो यांचा समावेश आहे.
तेलंगणला आंध्र प्रदेशापासून वेगळे करून स्वतंत्र राज्य बनविणा:या आंध्र प्रदेश पुनर्गठन कायदा 2क्14 मध्ये सीमांध्र क्षेत्रसाठी केंद्र सरकारतर्फे विविध गुंतवणूक आणि इतर तरतुदींचाही समावेश आहे. ही आश्वासने पूर्ण करण्यास मोदी सरकारला संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सोनिया गांधी यांनी पत्रत दिली आहे. 
2क् फेब्रुवारी 2क्14 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यसभेत आणखी काही आश्वासने दिली होती. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतले होते. याकडेही काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. पत्रसोबत उभय नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची प्रतही त्यांनी जोडली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4सोमवारी लिहिलेल्या या पत्रत सोनिया म्हणतात, जलस्नेत, विशेष श्रेणीचा दर्जा देणो, पोलावरम योजनेचे कार्यान्वयन आदींसंदर्भात आवश्यक कार्याचा प्रारंभ संपुआ सरकारने यापूर्वीच केला आहे. आम्ही जे काम पूर्ण केले. त्याची अंमलबजावणी आपले प्रशासन पुढेही सुरूठेवेल, अशी अपेक्षा आहे. 

Web Title: Complete the promise to the threshold