शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांविरोधात तक्रारी!

By admin | Updated: February 23, 2015 23:56 IST

मनमानीपणाचाही आरोप : शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकारी आक्रमक

सातारा : ‘शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पालकमंत्री मानसन्मान देत नाहीत, कधी भेटीस वेळ देत नाहीत. त्याचबरोबर त्यांच्या दौऱ्याचीही माहिती दिली जात नाही, अशा शब्दांत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याविरोधात विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत तक्रारींचा पाढाच वाचला. दुपारी एकला सुरू झालेली ही बैठक तब्बल पाच तास चालली.दरम्यान, पालकमंत्री साताऱ्यात असूनही त्यांच्या दौऱ्याकडे या बैठकीच्या निमित्ताने एकप्रकारे अनेक शिवसैनिकांनी पाठच फिरविल्याचे दिसून आले.येथील विश्रामगृहावर शिवसेनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे, हर्षल कदम, माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, हणमंत चवरे, चंद्रकांत जाधव, आदी उपस्थित होते. बैठकीत नरेंद्र पाटील यांनी आक्रमकपणे आपले मुद्दे मांडले. ते म्हणाले, ‘सातारचे पालकमंत्री म्हणून विजय शिवतारे यांची नियुक्ती झाली आहे; पण त्यांच्याकडून शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळत नाही. दौऱ्याची माहिती दिली जात नाही. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी छोट्या गोष्टींसाठी लाचारी पत्करू नये. शिवसेना या चार शब्दांना असणारी किंमत आपल्या वृत्तीमुळे कमी होईल, असे वागू नये.’ दरम्यान, या बैठकीसंबंधी नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, ‘ही बैठक नेहमीप्रमाणे संघटनात्मक बाबी आणि आगामी सहकारातील निवडणुका यावर होती. यामध्ये अन्य विषय चर्चीले नाहीत. (प्रतिनिधी)शिवसेनेची बैठक माझ्याच नेतृत्वाखाली झालेली आहे. त्यामध्ये कोणताही वाद झालेला नाही. पालकमंत्र्यांनी कोणाचेही काम थांबविलेले नाही. आजच्या बैठकीत पक्षसंघटनेवर चर्चा झाली.- प्रा. नितीन बानुगडे-पाटील, शिवसेनेचे उपनेते